Friday , June 5 2026
Breaking News

सौंदलगा येथील हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हायस्कूलमध्ये बैठकीचे आयोजन

Spread the love

 

सौंदलगा : सौंदलगा येथील न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा या हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. 21 /6 /1973 रोजी या हायस्कूलची स्थापना सौंदलगा येथे करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे हायस्कुल असून या भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाचे एक केंद्रबिंदू म्हणून या हायस्कूलकडे पाहिले जाते. या हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 21/6/2022 ते 21/ 6/2023 हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असून यासाठी सर्व संस्थाचे पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थी तसेच पत्रकार या सर्वांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून हायस्कूलमध्ये सर्वांनी हजर राहण्याचे असून यासाठी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे तसेच या वर्षामध्ये करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबद्दल चर्चा आणि विचार विनिमय करण्यासाठी सर्वांची मते जानण्यासाठी सर्वांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे रयत परिवार सौंदलगा यांनी कळवले आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत इंटरनेट सेवेची गती मंदावल्याने आधार कार्डासह उतारे मिळविण्यासाठी धावपळ

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील अनेक ठिकाणी इंटरनेट बंद पडल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *