Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे गॅंगवाडी येथे विजयोत्सव साजरा

  बेळगाव : आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती झाल्याने शहरात मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. आज राष्ट्रपती निवडणूक निकाल जाहीर झाला असून द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती पदावर रुजू झाले आहेत. आज झालेल्या मतमोजणी एनडीएकडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा जास्त मते द्रौपदी मुर्मु यांना मिळाले आहेत. आज द्रौपदी मुर्मु या …

Read More »

उचगाव फाट्यावरील कमानीला हात लावाल तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा

  कर्नाटक सरकारला उचगाव ग्रामस्थांचा इशारा बेळगाव : उचगाव फाट्यावरील कमानीला हात लावाल तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा, असा खणखणीत इशारा कर्नाटक सरकारला उचगाव ग्रामस्थांनी दिला आहे. स्वागत कमानीवरील मराठी व कन्नड मजकुरासंदर्भात निर्णय घेण्यासाठी अधिकारी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकऱ्यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आले होती. या बैठकीत ग्रामस्थांनी …

Read More »

टिप्परने ५४ बकऱ्यांना चिरडले

  अंमणगी-मुगळी रस्त्यावर अपघात संकेश्वर (महंमद मोमीन) : अंमणगी-मुगळी रस्त्यावर आज सायंकाळी ५ वाजता भरधाव टिप्परने बकऱ्यांना चिरडून झालेल्या अपघातात सर्व ५४ बकरी दगावले आहेत. अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी अंमणगी-मुगळी येथे बकरी चारवून घराकडे परतणाऱ्या हालप्पा हेगडे, लगमण्णा हेगडे यांच्या कळपातील बकऱ्यांना अंमणगीहून मुगळीकडे भरवेगात निघालेल्या टिप्पर क्रमांक …

Read More »

श्रींचा वाढदिवस भक्तीभावाने साजरा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचा वाढदिवस भक्तगणांनी श्रींच्या आशीर्वादाने भक्तीमय वातावरणात साजरा केला. आज दिवसभर भक्तगणांनी श्रींची प्रत्यक्ष भेट घेऊन श्रींना शाल श्रीफळ पुष्पहार अर्पण करून सविनय शुभेच्छा प्रदान केल्या.सोबत श्रींचा आर्शीवादही घेतला. श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी …

Read More »

संकेश्वर येथील अंबिका नगर रस्ता मुरुमीकरणाला चालना..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर अंबिका नगरला जाणारा रस्ता खड्डेमय बनल्याने या मार्गे ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांची, शेतकऱ्यांची आणि नागरिकांची चांगलीच गैरसोय होऊ लागल्याची तक्रार युवा नेते महेश दवडते यांनी केली होती. त्यांनी येथे गटारची सोय नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसत असल्याचे तसेच पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहिल्याने …

Read More »

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती!

  नवी दिल्ली : देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत. या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० …

Read More »

डीकेशी, सिद्धू अन एचडीकेंना मुख्यमंत्र्यांचा टोला

  बेेंगळुरू : मुख्यमंत्री कोणी व्हायचे हे जनता ठरवेल. लोक निर्णय घेण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा करत आहेत, असा टोला आज डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या आणि एचडीके यांना मुख्यमंत्र्यांनी लगावला. वक्कलिगा समाजाच्या मुख्यमंत्र्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी आज गुरुवारी मंड्या जिल्ह्यातील केआरपेटे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब …

Read More »

कोल्‍हापूर महापालिका कनिष्‍ठ अभियंता दहा हजारांची लाच घेताना जाळ्यात

कोल्‍हापूर : नवीन पाणी कनेक्‍शन मंजूरीसाठी १० हजारांची लाच घेताना महापालिका शहर पाणी पुरवठा विभागाचा कनिष्‍ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या जाळ्यात सापडला. राजेंद्र बळवंत हुजरे (वय ४५, रा. आर. के. नगर) असे संशयिताचे नाव आहे. रंकाळा स्‍टॅन्‍ड परिसरात ही कारवाई करण्‍यात आली. तक्रारदार हे महापालिकेकडील मान्‍यताप्राप्‍त प्‍लंबर आहेत. त्‍यांनी दोन …

Read More »

महापौर निवडणुकीच्या आशा पल्लवीत!

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन दहा महिने झाले मात्र अद्याप स्मार्ट सिटीला महापौर, उपमहापौर मिळालेला नाही. बेळगावचे उपमहापौर पद ओबीसीसाठी राखीव आहे त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणावर निर्णय होत नाही तोपर्यंत ही निवडणूक होणार नसल्याचे प्रादेशिक आयुक्तांनी जाहीर केले होते. त्यामुळे महापौर निवडणूक झाली …

Read More »

आरटीओ सर्कलजवळील बसस्थानकाची दयनीय अवस्था

बेळगाव : बेळगावची निवड स्मार्ट सिटीमध्ये झाली आहे. एकीकडे शेकडो कोटीच्या अनुदानातून बेळगाव स्मार्ट होत असताना बेळगावच्या प्रवेशद्वारांपासून हाकेच्या अंतरावरील बसस्थानक दयनीय अवस्थेत आहे. बेळगावमधील सीबीटी बसस्थानकातून बाहेर पडले की पहिला बसथांबा हा आरटीओ सर्कलचे बसस्थानक आहे. बसस्थानकाचे छत पूर्णपणे गंजलेल्या अवस्थेत आहे. आसन व्यवस्था नाही त्यामुळे या मार्गावरुन ये-जा …

Read More »