Sunday , July 26 2026
Breaking News

द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे गॅंगवाडी येथे विजयोत्सव साजरा

Spread the love

 

बेळगाव : आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती झाल्याने शहरात मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. आज राष्ट्रपती निवडणूक निकाल जाहीर झाला असून द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती पदावर रुजू झाले आहेत. आज झालेल्या मतमोजणी एनडीएकडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा जास्त मते द्रौपदी मुर्मु यांना मिळाले आहेत.

आज द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती झाल्याबद्दल शहरातील गॅंगवाडीमध्ये सर्वांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी ढोल ताशा वाजवून जल्लोषी वातावरणात नागरिकांना मिठाईचे वाटप केले.

याप्रसंगी आमदार अनिल बेनके यांनी सुद्धा गॅंगवाडी भागांमध्ये जाऊन सर्वांच्या आनंदात सहभागी झाले. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला.

यावेळी ते म्हणाले की, देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती मिळाल्याने आता आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. द्रौपदी मुर्मु यांनी आमदार, खासदार, राज्यपाल पदी काम केले आहे. तसेच त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास मोठा असल्याने त्यांची राष्ट्रपती निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *