Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

सांबरचे कातडे बाळगल्याप्रकरणी अरण्य खात्याकडून एकाला अटक

  बेळगाव : अरण्य खात्याच्या संचारी सीआयडी पथकाने कित्तुर येथे धाड टाकून एका व्यक्तीकडून सांबरचे कातडे जप्त केले. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मधुकर गोपाळराव देशपांडे (५३) रा. गद्दी गल्ली, कित्तुर असे आहे. ही कारवाई अरण्य खात्याच्या सीआयडी संचारी पथकाच्या प्रमुख पीएसआय रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मधुकर देशपांडे हे …

Read More »

भारतात मंकीपॉक्सची एन्ट्री!; केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

  नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून मंकीपॉक्स विषाणूचा जगभर धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत 20 हून देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे. आता केरळच्या कोल्लममध्ये देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे. भारतात केरळच्या कोल्लम येथे मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. टीवीएम …

Read More »

सौंदलगा हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाखेमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्री. प्रदीप हरिभाऊ जोशी सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक समाज विकास विद्यालय सागाव तालुका शिराळा यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचा उपयोग व्यवहारात कसा करावा हे सांगत गुरु शिष्य …

Read More »

संकेश्वरात आगीच्या दुर्घटनेत स्टेशनरी-किराणा दुकानाचे लाखोंचे नुकसान

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नेहरु रस्ता येथील अरविंद कुलकर्णी यांचे सेंट्रल स्टोअर्स आणि गजानन रत्नप्पा मेहतर यांच्या किराणा दुकानाला आज सकाळी ६ वाजता शाॅर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची दुर्घटना नेमकी कशामुळे घडली यांची चौकशी संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी …

Read More »

बॉक्सिंग बेतली जीवावर, बंगळुरुत सामन्यादरम्यान जखमी बॉक्सरचा मृत्यू, आयोजकांवर गुन्हा दाखल

बेंगळुरू : एक धक्कादायक घटना कर्नाटकच्या बंगळुरु शहरातून समोर आली आहे. एका किकबॉक्सरला बॉक्सिंग सामन्यादरम्यान रिंगमध्ये गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय मृत किक बॉक्सर हा म्हैसूरचा रहिवाशी असून निखिल एस. असं त्याचं नाव आहे. दरम्यान निखिलच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर सामने आयोजित करणाऱ्या आयोजकांविरुद्ध पोलिसांनी निष्काळजीपणाचा …

Read More »

शिडल्याळींची आरोग्य सेवा गरीबांना लाभदायक ठरावी : रमेश कत्ती

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात शिडल्याळींची आरोग्य सेवा गोरगरिबांना लाभदायक ठरावी, असे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते शिडल्याळी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. श्रींच्या व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने समारंभाची …

Read More »

बस पासपासून 50 टक्के विद्यार्थी वंचित

बेळगाव : शैक्षणिक वर्ष चालू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरी अद्याप 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना बस पास मिळालेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. आत्तापर्यंत चाळीस हजार विद्यार्थ्यांना बस पास मिळाला आहे. मात्र अजूनही चाळीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांना बस पास मिळण्याची आवश्यकता आहे. जुलै अखेरीस बाकीचे …

Read More »

गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांचा तुरुंगवास; मानवी तस्करीसाठी कोर्टाने सुनावली शिक्षा

पटियाला: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गायकाला पंजाब पोलिसांनी अटक केली असून यामागचे कारण धक्कादायक आहे. दलेरला मानवी तस्करी प्रकरणी अटक झाली आहे. या प्रकरणात त्याची 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. अशी माहिती मिळते आहे की दलेरला पटियाला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात येणार …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेलीतर्फे रेहानला मदत

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली व ऑपरेशन मदत यांच्यावतीने रेहान हलसंगी या आठवीच्या विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य व रेनकोट देण्यात आला. रेहान सरदार हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत असून त्याची आई सलमा हलसंगी या पेट्रोल पंपावर काम करतात. रेहान होतकरू असून त्याला शैक्षणिक साहित्याची गरज होती. त्यांनी प्राईड सहेलीच्या …

Read More »

साईज्योती सेवा संघाच्या वतीने ठळकवाडी हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

बेळगाव : गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून साईज्योती सेवा संघाच्या वतीने ठळकवाडी हायस्कूल येथे गुरुजनांचा पाद पूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जीवनात मार्ग दाखवण्याचे काम गुरु करतात. गुरुच्या कृपेने आयुष्याचा मार्ग बदलतो. युवा पिढीने गुरूंबद्दलचे आदर राखून त्यांचा आदर्श घ्यावा. गुरूंनी घालून दिलेल्या विचारांचा जीवनात उपयोग करून त्या संधीचे सोने करावे, …

Read More »