Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

साईज्योती सेवा संघाच्या वतीने ठळकवाडी हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

बेळगाव : गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून साईज्योती सेवा संघाच्या वतीने ठळकवाडी हायस्कूल येथे गुरुजनांचा पाद पूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जीवनात मार्ग दाखवण्याचे काम गुरु करतात. गुरुच्या कृपेने आयुष्याचा मार्ग बदलतो. युवा पिढीने गुरूंबद्दलचे आदर राखून त्यांचा आदर्श घ्यावा. गुरूंनी घालून दिलेल्या विचारांचा जीवनात उपयोग करून त्या संधीचे सोने करावे, …

Read More »

मंगाईदेवी यात्रा उत्साहात साजरी करण्याचा निर्णय

बेळगाव : वडगावची ग्रामदेवता मंगाईदेवी यात्रा येत्या 26 जुलै रोजी साजरी करण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून यात्रा साजरी करण्यात आली नव्हती मात्र देवीचे धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाचे संकट बहुतांश कमी झाले आहे त्यामुळे या वर्षीची यात्रा उत्साहात साजरा करण्याचा …

Read More »

राज्यात मुदतपूर्व निवडणुकीच्या हालचाली गतिमान?

बेंगळुर : कर्नाटकात मुदतपूर्व निवडणुकीचे वारे वाहू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एकंदर तीन्ही मोठ्या राजकीय पक्षाच्या वाढत्या कार्यक्रमांचा आलेख पाहता विधानसभा निवडणुका मुदतपूर्व होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीला नऊ महिने बाकी असताना राज्यातील सत्ताधारी भाजप, काँग्रेस, धजद सारख्या मोठ्या पक्षांच्या राजकीय हालचाली पाहता मुदतपूर्व निवडणुका …

Read More »

संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; वडगाव भागात पूरस्थिती!

बेळगाव : बेळगावात पावसाने थैमान घातले आहे. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव परिसरात मागील 15 दिवसांपासून पावसाची संततधार चालूच आहे. मात्र गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. वडगावमधील अन्नपूर्णेश्वरी नगर, केशवनगर, साई कॉलनीचा काही भाग पाण्याखाली गेला आहे. अन्नपूर्णेश्वरी नगर सहावा …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावरील बुरुज कोसळला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची दुरावस्था सुरुच आहे. पन्हाळगडावरील बुरुजांची घसरण सुरूच असताना आता विशालगड किल्ल्यावर देखील असाच प्रकार आढळून आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याचा आज बुरुज ढासळला आहे. सुदैवाने पर्यटक गडावर नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गडावर जाण्यासाठी असलेल्या …

Read More »

हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारूती मंदिर पाण्याखाली

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूती मंदिर गेल्या आठवड्यापासून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याचा साठा वाढल्याने मंदिर पाण्याखाली गेले आहे. मलप्रभा नदीच्या पात्रात असलेल्या स्वयंभू मारूती मंदिराच्या स्लॅब बुडला आहे. नदीच्या पात्रात मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत …

Read More »

खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस; हलात्री पुलावर पोलिसांचा बंदोबस्त

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात येणार्‍या खानापूर-हेमाडगा गोवा महामार्गावरील हलात्री नदीच्या पुलावर गुरूवारी सकाळपासून पाणी आल्याने खानापूर पोलिसांनी खबरदारी म्हणून खानापूर-हेमाडगा गोवा रोडवरील हलात्री नदीच्या पुलावरील वाहतुक बॅरिकेट लावून थांबविली आहे. गेल्या आठवड्यापासून खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील नद्या, नाले, तलाव, दुथडी भरून वाहत आहेत. गुरूवारी …

Read More »

पंचगंगा नदीची पातळी 37.2 फुटांवर; 58 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीपासून केवळ दोन फूट दूर आहे. गुरुवारी दुपारी एकवाजेपर्यंत ही पातळी 37.2 फुटांवर असून, जिल्ह्यातील एकुण 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. राधानगरी …

Read More »

शिंदे सरकारची भेट; पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त

  मुंबई : देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. आता आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री …

Read More »

झीरो ट्रॅफिकद्वारे किडनी धारवाडहून बेळगावात

बेळगाव : दोनच दिवसांपूर्वी धारवाडच्या एसडीएम हॉस्पिटलमधून एका तरुणीचे हृदय ग्रीन कॉरिडॉरद्वारे बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. ते हृदय एका मुस्लिम तरुणावर प्रत्यारोपण केल्यानंतर आता झीरो ट्रॅफिकद्वारे दुसरा अवयव धारवाडहून बेळगावला आणण्यात आला आहे. धारवाडच्या एसडीएम हॉस्पिटलमधून बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये झीरो ट्रॅफिक व्यवस्था उपलब्ध करून रुग्णवाहिकेतून आज किडनी आणण्यात …

Read More »