Friday , November 6 2026
Breaking News

पंचगंगा नदीची पातळी 37.2 फुटांवर; 58 बंधारे पाण्याखाली

Spread the love

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीपासून केवळ दोन फूट दूर आहे. गुरुवारी दुपारी एकवाजेपर्यंत ही पातळी 37.2 फुटांवर असून, जिल्ह्यातील एकुण 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग
आज दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापूमधील बारा नदींवरील एकुण 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधारा पाणी पातळी 37 फूट 2 इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून सध्या पाणी पातळी 37.2 फुटांवर आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे. राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कासारी मध्यम प्रकल्प धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरण पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाच्या सांडव्यातून व विद्युत विमोचकाद्वारे नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात येत आहे. कासारी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

महालक्ष्मी मंदिरातील कामे वेगाने पूर्ण करा – जिल्हाधिकारी

Spread the love  कोल्हापूर (जिमाका) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील कामे तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *