Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे : ज्येष्ठ विचारवंत आर. वाय. पाटील

  द. म. शि. मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटनेची बैठक बेळगांव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजची शिक्षण पद्धती ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारलेली असून तिच्यामध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. माणसाला जगण्यासाठी व जीवनासाठी शिक्षणामधून ज्ञान मिळाले पाहिजे, त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार …

Read More »

मुडेवाडी शाळेची इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम सुरू आहे. तालुक्यातील गर्लगुंजी येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेची वर्गखोली शुक्रवारी रात्री कोसळली. ही घटना ताजी असतानाच मुडेवाडी (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेची इमारत नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री कोसळली. सुदैवाने रविवारी शाळेला सुट्टी होती त्यामुळे कोणतीच जीवितहानी झाली …

Read More »

‘प्रगतिशील’च्या बैठकीत संमेलनाचा हिशोब सादर

बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या साप्ताहिक बैठकीत संघाने आयोजित केलेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचा जमाखर्च सादर करण्यात आला. संघाचे कार्यवाह कॉ. कृष्णा शहापूरकर यांनी जमाखर्च सादर केला व संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्या संस्था आणि व्यक्तींनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन आयोजित केले जाईल असे …

Read More »

निपाणी तालुक्यातील माणकापुरात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

निपाणी : विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील माणकापूर गावात घडली. अर्चना गजानन बाळशेट्टी या 35 वर्षीय विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील माणकापूर गावात घडली. विहिरीवरील मोटारपंप संचाला स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अर्चनाला इचलकरंजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. …

Read More »

प्रगतिशील लेखक संघात संतसाहित्यावर चर्चा

बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या गेल्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत आषाढी एकादशीनिमित्त संतसाहित्य व चळवळ या विषयांवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते. मेणसे यांनी तुकाराम यांच्यापासून ते तुकडोजी महाराज यांच्या पर्यंतच्या भारतातील संत परंपरेची माहिती दिली. सर्वच संतानी अंधश्रद्धा अनिष्ट रुढी बुवाबाजी यावर आपल्या भजन किर्तनातून कठोर प्रहार …

Read More »

शिवसेनेच्या आमदारांना तुर्तास दिलासा! सुनावणी होईपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणतीही कारवाई करु नये : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या ५३ आमदारांना बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होईपर्यंत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी आमदारांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये. हे प्रकरण …

Read More »

कृष्णा नदीतून कर्नाटक राज्यात ५ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग; ग्रामस्थांमध्‍ये महापुराची भीती

कुरुंदवाड : कृष्णा नदी क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ होऊन २९ फूट तीन इंच पाणी पातळी झाली आहे. राधानगरी धरण क्षेत्रात पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने एक फुटाने पाणी पातळी कमी होऊन ३२ फूट सात इंच इतकी पाणी पातळी झाली आहे. आज सकाळी पाटबंधारे विभागाने दिलेल्या …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सध्या पाणी पात्राबरोबर वाहू लागले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निपाणी व कागल तालुक्यात पाऊस थोडा कमी असला तरी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर असल्याच्या कारणाने दुधगंगा नदीच्या …

Read More »

विठ्ठल कोळेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. सकाळपासूनच विठ्ठल कोळेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतक सभासद नागरिक यांनी गर्दी केली होती. येथील गर्ल हायस्कूल व इंग्लिश मीडियम स्कूल येथे विठ्ठल कोळेकर यांचा पांडुरंग काजवे महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन …

Read More »

सूर्यकुमारचे शतक व्यर्थ, इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली, 17 धावांनी भारत पराभूत

नॉटींगहम : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी20 मालिकेचा तिसरा सामना नुकताच इंग्लंडच्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज मैदानात पार पडला. या हायवोल्टेज सामन्यात अखेर भारताचा 17 धावांनी पराभव झाला. पण तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने आधीच जिंकल्याने मालिका भारताने 2-1 ने खिशात घातली आहे. दरम्यान या रोमहर्षक सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने …

Read More »