Sunday , July 26 2026
Breaking News

कृष्णा नदीतून कर्नाटक राज्यात ५ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग; ग्रामस्थांमध्‍ये महापुराची भीती

Spread the love

कुरुंदवाड : कृष्णा नदी क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ होऊन २९ फूट तीन इंच पाणी पातळी झाली आहे. राधानगरी धरण क्षेत्रात पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने एक फुटाने पाणी पातळी कमी होऊन ३२ फूट सात इंच इतकी पाणी पातळी झाली आहे.
आज सकाळी पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजापूर बंधाऱ्यातून ५ हजाराने क्‍युसेक विसर्ग वाढला असून, ७० हजार क्‍युसेक पाण्याचा कर्नाटक राज्यात विसर्ग सुरू आहे. दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ झाल्यास बॅक वॉटरमुळे कुरुंदवाड दरम्यानचा शिरढोण पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पंचगंगा नदीक्षत्रात पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने पाणी पातळीत ५ ते ६ इंचाने घट होत आहे. कृष्णा नदी क्षेत्रात पावसाने सातत्य ठेवल्याने दररोज रात्रीतून फुटाने वाढ होऊन ५ हजाराने पाण्याच्या विसर्गात वाढ होत आहे. आज सकाळी ८ वाजता कृष्णा पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यांची पाणी पातळीची पुढील प्रमाणे- तेरवाड बंधारा ५१ फूट ६ इंच, शिरोळ बंधारा ४२ फूट, यादव पूल ४० फूट तर कृष्णा नदी राजापूर बंधारा २९ फूट ३ इंच झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *