Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

शहर परिसरात आषाढी एकादशी साजरी

दर्शनासाठी भाविकांची गर्दी : ठिकाणी खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात रविवारी (ता.१०) आषाढी एकादशी साजरी करण्यात आली त्या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकाणी खिचडीचे वाटप करण्यात आले. श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या  विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त पहाटे पाच …

Read More »

भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू, महाराष्ट्रानंतर आता गोव्यात प्रयोग; शरद पवारांचा आरोप

औरंगाबाद: भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू असून कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही असा प्रयोग राबवला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ झालेले आता कमी अस्वस्थ झाले असतील असा टोला त्यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मध्यावधी निवडणुका होतील असं कधीच …

Read More »

आंबोली घाटात पर्यटकांची हुल्लडबाजी

बेळगाव : संततदार पावसामुळे वर्षा पर्यटनाला ऊत आला आहे. निसर्गरम्य ठिकाणच्या धबधब्या जवळ पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी बेळगाव -सावंतवाडी मार्गावरील आंबोली घाटात पर्यटकांची एकच गर्दी उसळली. वाहनांची मोठी रिघ पाहायला मिळाली. वाहनांच्या गर्दीमुळे ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच तळीराम पर्यटकांच्या हूल्लडबाजीमुळे ट्रॅफिक …

Read More »

‘अंकुरम’ मध्ये रंगला आषाढी एकादशी सोहळा

चिमुकल्यांनी केल्या वेशभूषा : शाळेभोवती रिंगण सोहळा  निपाणी (वार्ता) : अंगात पांढरे सदरे घातलेले विद्यार्थी, गळ्यात टाळ, विठ्ठल -रुक्मिणीची वेशभूषा, डोक्यावर तुळस, हातात भगवा पताका, विठू माऊलीचा जयघोष, शाळेभोवती रिंगण सोहळा अशा भक्तिमय वातावरणात येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी सादर …

Read More »

संकेश्वरात आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी

संकेश्वर (महंमद मोमीन) :  संकेश्वरात आज देवशयनी आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. येथील गांधी चौक विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि गोंधळी गल्लीतील श्री विठ्ठल मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. भक्तगण रांगेत उभे राहून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेवून पुनित होताना दिसले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव …

Read More »

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये गोळीबार, 14 जणांचा मृत्यू

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील एका बारमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना जोहान्सबर्गमधील सोवेटो टाऊनशिपमध्ये घडली. पोलीस लेफ्टनंट इलियास मावेला यांनी सांगितले की, काल रात्री 12.30 च्या सुमारास गोळीबार झाला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो, तोपर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला …

Read More »

गोव्यात राजकीय भूकंप? काँग्रेसचे 9 आमदार भाजपच्या वाटेवर

पणजी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर आता गोव्यातही राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. गोव्यात काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाच्यावर आला असून पक्षाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे 9 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. सध्या नाराज आमदारांची मनधरणी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव पक्षांतर रोखण्यासाठी …

Read More »

गर्लगुंजीत मराठी मुलांच्या शाळेची दुसरी वर्गखोली जमिनदोस्त

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीची वर्ग खोली एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने जमिनदोस्त झाली. पाठोपाठ शुक्रवारी रात्री पुन्हा एक वर्गखोली कौलारू छतासह जोरदार पावसामुळे जमिनदोस्त झाली तर अजून दोन खोल्या पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दहा वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या कौलारू वर्गखोलीचे काम निकृष्ट …

Read More »

विद्यार्थांना चांगल्या दर्जाचे बुट, साॅक्स द्या

राजेंद्र वड्डर : अन्यथा आंदोलन निपाणी (वार्ता) : दोन वर्ष्याचा प्रदीर्घ कोरोना महामारीच्या अडथळ्या नंतर या वर्षी कर्नाटक सरकारकडून पुन्हा लवकरच विद्यार्थ्यांना बूट आणि पायमोजे देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय सदर सर्व जबाबदारी एसडीएमसी सदस्यांना देण्यात आल्याने गळतगा येथील विद्यार्थ्यांना एसडीएमसी सदस्यांनी चांगले आणि दर्जेदार बूट आणि पायमोजे वितरण …

Read More »

बेळगावात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा

बेळगाव : जोरदार पाऊस असूनही बेळगावात मुस्लिम बांधवांनी रविवारी बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा केला. बेळगावातील विविध मशिदींमध्ये सकाळी ईदच्या नमाजचे आयोजन करण्यात आले होते. अंजुमन संस्थेतर्फे शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता ईदची सामुहिक नमाज अदा करण्यात आली. पाऊस असूनही ईदगाह मैदानावर झालेल्या नमाजात मोठ्या संख्येने लोक सहभागी …

Read More »