Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

बेळगाव : जोरदार पाऊस असूनही बेळगावात मुस्लिम बांधवांनी रविवारी बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
बेळगावातील विविध मशिदींमध्ये सकाळी ईदच्या नमाजचे आयोजन करण्यात आले होते. अंजुमन संस्थेतर्फे शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता ईदची सामुहिक नमाज अदा करण्यात आली. पाऊस असूनही ईदगाह मैदानावर झालेल्या नमाजात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
यावेळी बोलतांना मुफ्ती अब्दुल अजिज काझी यांनी बकरीद सणाचे महत्व सांगितले. या महिन्यात लाखो भाविक आपल्या इस्लामचे पवित्र स्थान मक्का येथे जाऊन हज यात्रा पूर्ण करतात. त्याचप्रमाणे या दिवशी जनावराचा बळी दिला जातो. त्यामुळे बेळगावातही आपण सण इतर समाजातील लोकांना त्रास होणार नाही असे शांततेत ईद साजरी केली पाहिजे असे सांगून यानिमित्त गरीब लोकांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार फिरोज सेठ, अंजुमन इस्लाम संघटनेचे अध्यक्ष राजू सेठ व इतर मुस्लिम नेत्यांनी सर्वाना बकरी ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी एसीपी नारायण बरमनी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांपासून स्वच्छ पांढरे कपडे घातलेले सर्वजण सामूहिक प्रार्थनेत सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *