Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

कोगनोळी येथील भाविक पंढरपूरला रवाना

कोगनोळी : पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त विठोबा दर्शनासाठी कोगनोळी तालुका निपाणी येथील शेकडो भाविक मंगळवार दि. 5 जुलै रोजी बसने रवाना झाले. येथील ग्रामदैवत श्री अंबिका मंदिराजवळ बापूसाहेब पिडाप पाटील व बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते बसचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना बापूसाहेब पाटील म्हणाले, कोगनोळी वारकरी व भाविकांच्या …

Read More »

वेटलिफ्टिंगपटू मराठा युवतीचा किरण जाधव यांनी केला सन्मान : दानशूरांना केले मदतीचे आवाहन

बेळगाव : वेटलिफ्टिंग या क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये हालगा – बेळगावच्या ज्या युवतीबद्दल गौरवोद्गार काढले, त्या शेतकरी कन्या असणार्‍या शूर मराठा युवतीचा विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांनी आर्थिक मदत देऊन सन्मान केला. अक्षता बसवंत कामती, राहणार हालगा, …

Read More »

महापौर, उपमहापौर निवडणूक घ्या; अन्यथा पालिकेला टाळे ठोकू

आम आदमी पक्षाकडून सरकारला इशारा बेळगाव : येत्या तीन दिवसांत बेळगाव महानगरपालिकेने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक घ्यावी, अन्यथा महापालिका कार्यालयाला टाळे ठोकू, असा कडक इशारा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला दिला आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीला 9 महिने उलटले तरी अद्याप महापौर आणि उपमहापौरांच्या निवड झालेली नाही. निवडणूक जिंकली तरी नगरसेवकांच्या …

Read More »

आरोग्य सौध बेंगळुर येथे आमदार अनिल बेनके यांची भेट

बेळगांव : दिनांक 07 जुलै 2022 रोजी आमदार अनिल बेनके यांनी आरोग्य सौध बेंगळुर येथे भेट दिली आणि एमसीएच, ट्रुमा सेंटर, नर्सिंग कॉलेज आणि वसतिगृहाच्या आगामी प्रकल्पांबाबत संवाद सांधला. तसेच वसतिगृहाचे मुख्य अभियंता यांनी बेळगांव उत्तर मतदारसंघात हे ड्रीम प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे प्रतिपादन केले.

Read More »

पिठ आणि मैदा निर्यातीवर केंद्र सरकारचे कठोर निर्बंध

नवी दिल्ली : गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता केंद्र सरकारने पिठाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. केंद्र सरकारकडून पिठ निर्यातीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहे. या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पिठाच्या निर्यातीसाठी Inter-Ministrial Committee ची परवानगी आवश्यक असणार आहे. या नव्या मार्गदर्शक सूचना 12 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार …

Read More »

कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळ लि. कार्यालयाला आमदार अनिल बेनके यांची भेट

बेळगांव : दिनांक 07 जुलै 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी बेंगळूर येथील कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळ लि. या कार्यालयाला भेट दिली. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे व महामंडळाच्या इतर मान्यवरांची भेट घेतली व मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आमदारांसमवेत मराठा विकास …

Read More »

पन्हाळा तालुक्यातील कळे येथे बालविवाह रोखण्यास यश

कोल्हापूर (जिमाका) : कळे गावातील इयत्ता 12 मध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात बाल कल्याण समितीला यश आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्यांना 6 जुलै रोजी पन्हाळा तालुक्यातील कळे येथील इ. 12 वीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन बालिकेचा बालविवाह …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या नेत्यासह तिघांची गोळ्या घालून हत्या, अंदाधुंद गोळीबार करून हल्लेखोर पळाले

कोलकात्ता : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात आज टीएमसी नेते स्वपन माझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्यासोबत आणखी दोन जणांना गोळ्या लागल्या, त्यांचाही जागीच मृत्यू झाला. आज सकाळी तृणमूल नेते आपल्या दोन साथीदारांसह घरातून दुचाकीवरून निघाले असताना हे तिहेरी हत्याकांड घडले. काही गुंडांनी मोटारसायकल थांबवून अंदाधुंद गोळीबार …

Read More »

जयतीर्थ मूळ वृंदावनाची बदनामी थांबवा

ब्राह्मण समाजाच्यावतीने निदर्शने बेळगाव : कलबुर्गी जिल्ह्यातील सेडम तालुक्यातील कागीना नदीच्या तीरावरील श्री जयतीर्थाच्या मूळ वृंदावनाबद्दल काही लोकांकडून होणारा अपप्रचार थांबवावा आणि तो करणार्‍यांवर सरकारने कारवाई करावी, या मागणीसाठी बेळगावात ब्राह्मण समाजातर्फे आज आंदोलन करण्यात आले. कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील अणेगोंडी येथील नव वृंदावन येथे रघुवर्य तीर्थाच्या वृंदावनाला जयतीर्थाचे वृंदावन …

Read More »

‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी देशात कायदा करावा! : अधिवक्ता उमेश शर्मा

कोल्हापूर : ‘वंदे मातरम्’ला वर्ष 1909 या वर्षी मुस्लिम लीगने प्रथम विरोध केला आणि ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे 1947 ला भारताची फाळणी करून दुसर्‍या देशात म्हणजे पाकिस्तानात गेले. ‘वंदे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्याला देशातील प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे. अन्यथा आपल्याला देशाचे नागरिक म्हणून घेण्याचा काही अधिकार …

Read More »