Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

कौंदल येथील मराठी शाळेत वारूळ, सापाची राहुटी; विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शाळा इमारतीची बिकट परिस्थिती असतानाच कौंदल (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळा इमारतीत वारूळ उभारल्याने तसेच वर्गखोलीत सापाचे दर्शन झाल्याने विद्यार्थी तसेच शिक्षकवर्गात आणि पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले यांनी कौंदल शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. …

Read More »

संकेश्वर येथील जुना पुणे-बेंगळूर रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरल्याचे निजलिंगप्पा दड्डी यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरीकरणाचे काम करतांना दुभाजक ऐवजी रस्त्याच्या मधोमध कसेबसे पेव्हरचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकी चारचाकी वाहने घसरुन येथे अपघात घडत आहेत. सदर रस्ता कामांसाठी …

Read More »

परिपत्रकांसंदर्भातील खटल्याची सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत लांबणीवर

बेळगाव : सरकारी परिपत्रके मराठीत मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. त्या खटल्याची आज बुधवार दि. 6 जुलै रोजी होणारी सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सरकारी परिपत्रके मराठीतून मिळावी यासाठी म. ए. समितीने लढा उभारला आहे. त्या अनुषंगाने 2020 मध्ये जिल्हाधिकारी …

Read More »

आप्पाचीवाडीत आढळला मृतदेह

कोगनोळी : आप्पाचीवाडी (तालुका निपाणी) येथील घुमट मंदिरासमोरील बसस्थानकात एकाचा मृतदेह आढळला. राजेंद्र कृष्णात चव्हाण (वय – ४२, रा. आडी) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. राजेंद्र चव्हाण हा शनिवारी घरातून बाहेर पडला होता. दरम्यान आप्पाचीवाडी येथील घुमट मंदिरासमोरील बसस्थानकात झोपलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून …

Read More »

मुख्तार अब्बास नक्वी यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केंद्रीय अल्‍पसंख्‍याक मंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्‍यापूर्वी त्‍यांनी भाजप अध्‍यक्ष जे. पी. नड्‍डा यांची त्‍यांनी भेट घेतली. दरम्‍यान, नक्‍वी यांना लवकर मोठी जबबादारी देण्‍यात येईल, अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरु आहे. मात्र याबाबत नक्‍वी यांनी अधिकृतपणे विधान केलेले नाही. नक्‍वी हे राज्‍यसभा …

Read More »

बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठीच्या भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांची लवकरच बैठक

बेळगाव : कित्तुर मार्गे बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपदनाचा फेरआढावा तसेच पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी शेतकर्‍यांची बैठक लवकरच होणार आहे. नंदीहळ्ळी भागात रेल्वे मार्गासाठी सिमेंट खांब आणून टाकल्याचे समजताच शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. रेल्वेमार्ग सुपीक जमिनीतून न घालता पर्यायी मार्गे रेल्वेमार्ग करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. यापूर्वी देखील विविध शेतकरी …

Read More »

नगरसेवकांना प्रतीक्षा शपथविधीची!

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणूक होऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीदेखील अद्याप सभागृह अस्तित्वात नाही. नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी समारोह नाही त्यामुळे  नगरसेवकात नाराजी दिसून येत आहे. बेळगाव शहराला महापौर, उपमहापौर कधी मिळणार याकडे नगरसेवकांसह जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. महापौर, उपमहापौर निवडणूक ही राजकीय आरक्षणात अडकून पडली आहे. राज्य सरकारकडून …

Read More »

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा शनिवारपासून

बेळगाव : जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 9 आणि 10 जुलै रोजी जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निकच्या सभागृहात करण्यात आले आहे. 9 जुलै रोजी दुपारी 11.30 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 20 स्विस पद्धतीने होणार आहे. खुल्या गटातील विजेत्याला अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 2 हजार, …

Read More »

वेस्ट इंडिज दौरा : शिखर धवनकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट इंडिज दौर्‍यावर होणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. शिखर धवनला वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा केली. रोहित शर्मा, विराट कोहली, …

Read More »

इंद्रालिस स्कूल ऑफ चेस, हुबळी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंचे घवघवीत यश

बेळगाव : इंद्रालिस स्कूल ऑफ चेस, हुबळी यांच्यावतीने आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यनगर, बेळगावमधील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धीबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले. खुल्या ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत प्रशांत अनवेकर यांनी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक, साई मंगनाईक याने 8 व्या, अक्षत शेटवाल याने 13 व्या तर सक्षम जाधव याने 15 व्या क्रमांकाचे पारितोषिक …

Read More »