Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

बेळगाव : काल सोमवारपासून कर्नाटक राज्यात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन व वह्या वाटप कार्यक्रम सरकारी प्राथमिक शाळा भवानीनगर बेळगाव येथे आयोजित केला होता. कार्यक्रम व्यासपीठावर जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सेक्रेटरी मुकुंद महागावकर, संचालक धीरेंद्र मरळीहळी …

Read More »

छत्रपती संभाजीराजे यांचे महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र…

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि घडामोडींना वेग आला. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाचे दोन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक असे पाच जण सहजपणे निवडून येतील. खरी चुरस ही सहाव्या जागेसाठीच आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे जाहीर केले. त्याच्या एक दिवस आधी …

Read More »

श्रीपंत विवाह सोहळ्यासह, श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता

बेळगाव : श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्यावतीने दिनांक 14 ते 17 मे दरम्यान श्रीपंत बोधपीठ वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज मंगळवारी 17 मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधींबरोबर श्रीपंत विवाह सोहळ्याने श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता झाली. सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रीपंत गुरुचरित्र पोथी सामुदायिक वाचन शिबिर, श्रीपंत …

Read More »

संकेश्वरात काॅंग्रेस-भाजप आमने-सामने

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग 13 पोटनिवडणुकीचा प्रचार जोरदार चाललेला दिसत आहे. येथील गाडगी गल्लीतील प्रचार प्रसंगी काॅंग्रेस-भाजप आमने-सामने आल्यामुळे थोडासा गोंधळ उडालेला दिसला. काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी यांच्या प्रचार सभेत ॲड. विक्रम कर्निंग यांनी राज्यातील भाजप सरकारवर कडाडून टिका घालविल्याचे पाहून भाजपा कार्यकर्त्यांनी भारत माता की जय …

Read More »

नंदू मुडशी बाहेर कोठे आहेत : पवन कत्ती

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग 13 मधील भाजपाचे अधीकृत उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी हे संकेश्वरचे रहिवासी आहेत. याच प्रभागात कडधान्य व्यापारकरित ते लहानाचे मोठे झाले आहेत. त्यामुळे ते बाहेरचे उमेदवार असे सांगण्यात तथ्य नसल्याचे भाजपाचे युवा नेते पवन कत्ती यांनी सांगितले. प्रभाग 13 मध्ये नंदू मुडशी यांच्या प्रचारफेरीत …

Read More »

प्रभाग 13 साठी भाजपाला उमेदवार मिळाला नाही : ए. बी. पाटील

संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 पोटनिवडणूकसाठी भाजपाला उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे भाजपाने दुसऱ्या प्रभागातील व्यक्तीला उमेदवारी दिल्याचे काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते प्रभाग क्रमांक 13 मधील काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी यांच्या गाडगी गल्लीतील प्रचारसभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी बापू शिरकोळी यांनी भूषविले …

Read More »

येळ्ळूर येथील नाला झाला स्वच्छ….

बेळगाव : येळ्ळूरमधील सांबरेकर गल्लीतील नाला पावसाळा चालू होण्याआधी स्वच्छ करण्यात आला. कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेला नाला येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वतः लक्ष घालून त्या भागातील ग्राम पंचायत सदस्याना बरोबर घेऊन नाला स्वच्छ केला व गावातून शेतात जाण्यासाठी रस्ता केले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य …

Read More »

बेळगावच्या जलतरणपटू ज्योती होसट्टी यांची सुवर्ण भरारी!

बेळगाव : बेळगावच्या आघाडीच्या महिला जलतरणपटू कर्नाटक राज्य आरोग्य खात्याच्या कर्मचारी ज्योती होसट्टी -कोरी यांनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या पॅन इंडिया नेशनल मास्टर्स गेम्स -2022 मध्ये चक्क 4 सुवर्ण पदकं पटकावत घवघवीत यश संपादन करताना पुन्हा एकवार बेळगावचे नांव उज्ज्वल केले आहे. बेंगलोर येथील पदुकोण -द्रविड सेंटर येथे …

Read More »

समाजात सकारात्मक विचारांचे बीज माध्यमांना पेरावे लागेल : राजयोगी श्रीनिधी

बेळगाव : संपूर्ण जगात अशांतता पसरलेली पाहायला मिळत आहे. भेदभाव हिंसाचाराला महत्त्व दिले जात आहे. अशा काळात तरुण पिढीला नव्या दिशेने नेण्याचे आव्हान उभे आहे. समाजात सकारात्मक विचारांचे बीज पेरण्याचे काम माध्यमांना करावे लागेल, असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पीस ऑफ माईंड टीव्हीचे निवेदक राजयोगी श्रीनिधी यांनी बोलताना केले. …

Read More »

श्रीठाच्या खुल्या जागेने भाजी व्यापारी, शेतकऱ्यांना श्रीमंत बनविले : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटच्या खुल्या जागेने भाजी व्यापारी, भाजीपाला उत्पादक शेतकरी, हमाल यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन त्यांना श्रीमंत बनविल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटच्या ३० व्या वर्धापनदिन समारंभात सहभागी श्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. निडसोसी मठाचे …

Read More »