Sunday , July 26 2026
Breaking News

श्रीपंत विवाह सोहळ्यासह, श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता

Spread the love

बेळगाव : श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्यावतीने दिनांक 14 ते 17 मे दरम्यान श्रीपंत बोधपीठ वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज मंगळवारी 17 मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधींबरोबर श्रीपंत विवाह सोहळ्याने श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता झाली.
सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रीपंत गुरुचरित्र पोथी सामुदायिक वाचन शिबिर, श्रीपंत बाळेकुंद्री दत्त संस्थानात आयोजित करण्यात आले आहे. पोथीवाचनासह, कीर्तन, भजन, व अन्य कार्यक्रम गेल्या चार दिवसांपासून सुरू आहेत. श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिरात आरती, सामुदायिक नामस्मरण, सामुदायिक भजन, माझ गाव माझं बोधपीठ, प्रचारकांचे मनोगत, प्रशस्ती प्रदान सोहळा, बालगोपाळांसाठी विशेष कार्यक्रम, पालखी सेवा, महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज मंगळवारी सकाळी सात वाजता आरती झाली. त्यानंतर साडेसात वाजता सामुदायिक नामस्मरणाला सुरुवात झाली. सकाळी साडे आठ ते अकरा वाजेपर्यंत पोथु वाचनाचे पाचवे सत्र संपन्न झाले. त्यानंतर सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत श्रीपंत विवाह सोहळा संपन्न झाला. दुपारी महाप्रसाद झाला. दुपारी तीन ते साडेपाच या दरम्यान सहाव्या सत्राने पोथी वाचनाची सांगता झाली. त्याच बरोबर सायंकाळी पालखी सोहळा पार पडला आहे.
सलग चार दिवस सुरू असलेल्या या सोहळ्याला बेळगावसह महाराष्ट्रातून हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. श्रीपंत देवस्थानच्या वतीने सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी विविध प्रकारची चांगल्या प्रकारे सोय करण्यात आली होती.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *