Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

गर्लगुंजी माऊली यात्रोत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्री माऊली देवीच्या यात्रोत्सवाला बुधवारी दि. ११ रोजी झालेल्या महाप्रसादाला भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली. मंगळवारी दि. १० रोजी सायंकाळी माऊली देवीची पालखी माऊली मंदिराकडे प्रयाण झाली. त्यानंतर माऊलीदेवीची विधीवत पुजा होऊन गाऱ्हाणा घालुन यात्रेला सुरूवात झाली. बुधवारी दि. …

Read More »

शरद पवार – समिती नेत्यांच्यात सीमाप्रश्नासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा

बेळगाव : बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा केली. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज त्यांनी बेळगावातील मराठा बँकेच्या अमृत महोत्सव समारंभात भाग घेतल्यानंतर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमात भाग घेतला. याच दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसमवेत शरद पवार यांनी बैठक …

Read More »

स्वाभिमानाने जगले पाहिजे : खासदार शरद पवार

बेळगाव : ब्रिटिशांच्या विरोधात वीरराणी कित्तूर चन्नम्मा या स्वाभिमानाने लढल्या. त्यांच्या स्वाभिमानामुळेच आज देशाला स्वातंत्र्य मिळाले. प्रत्येकाने लाचारी न स्वीकारता स्वाभिमानाने जगले पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. अंकली (तालुका चिकोडी) येथे काल मंगळवारी वीरराणी कित्तूर चन्नम्मा पुतळ्याचे अनावरण, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या मद्यार्क निर्मिती …

Read More »

सिंहगर्जना युवक मंडळाचा “गुरुवंदना“ कार्यक्रमास पाठिंबा

बेळगाव : बेळगाव सकल मराठा समाजातर्फे येत्या रविवारी 15 मे रोजी आयोजित सकल मराठा समाजाचे प. पू. श्री मंजुनाथ स्वामी यांच्या गुरुवंदना सोहळ्यास कोनवाळ गल्ली येथील सिंहगर्जना युवक मंडळाने आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त करून सोहळा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. सकल मराठा समाज बेळगावतर्फे जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य श्री मंजुनाथ स्वामी …

Read More »

खासदार शरद पवार यांचे बेळगावात जल्लोषात स्वागत!

बेळगाव : माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरदचंद्रजी पवार यांचे बेळगावात आज जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भव्य आकाराचा पुष्पहार घालून, फटाक्यांच्या आतषबाजीत पवार यांचे स्वागत केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विविध कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी बेळगावात आज, बुधवारी आगमन झाले. यावेळी शहरातील चन्नम्मा चौकात …

Read More »

खाकी वर्दीतील दिलीप जाधव यांच्या माणुसकीचे मनोज्ञ दर्शन

महाड : पोलिस वा ‘खाकी वर्दी’ म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्या समोर उभी राहते. खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस अधिकार्‍याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असले तरी वर्दीतही अगोदर …

Read More »

सामाजिक कार्याचा आदर्श विजय मोरे : आमदार राजेश पाटील

बेळगाव : बेळगावचे माजी महापौर विजय मोरे म्हणजे सामाजिक कार्याचा एक आदर्श आहेत. त्यांचे सामाजिक काम सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे असेच आहे, असे गौरवोद्गार चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी काढले. चंदगड तालुक्यातील कुरणी येथे आज डॉ. जयवंत पाटील संचलित सावली आश्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मागील पंचवीस वर्षे बेळगावात शांताईच्या …

Read More »

बेळगाव बंटर संघाचा वर्धापन दिन उत्साहात

बेळगाव : बेळगाव शहरातील बंटर (नाडवर) संघाचा 38 वा वर्धापन दिन नुकताच न्यू गांधीनगर येथील बंटर भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील बंटर भवन येथे गेल्या रविवारी बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बंटर (नाडवर) संघाचा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख …

Read More »

मराठा बँकेची वाटचाल प्रशंसनीय : खासदार शरद पवार

बेळगाव : दिलेले कर्ज परतफेड न होण्याच्या आजच्या कठीण काळात ग्राहकांचे हित साधत बेळगावची मराठा को-ऑपरेटिव्ह बँक आज आपला अमृतमहोत्सव साजरा करत आहे ही प्रशंसनीय बाब असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी, संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळात 1942 ला सुरु झालेल्या बेळगावातील …

Read More »

बेळगाव ग्रामीण भागात जलजीवन योजनेला प्रारंभ

बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मुत्नाळ, सिद्धनभावी, हलगीमर्डी, नागेरहाळ, कमकारट्टी आदी गावांमध्ये बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सु. अंगडी यांच्या अमृत हस्ते जल जीवन मिशन योजनेला चालना देण्यात आली. याप्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हे मोदींचे …

Read More »