Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

सकल मराठा समाजाची महत्वाची बैठक मंगळवारी

बेळगाव : 15 मे रोजी होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या “गुरुवंदना” कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार दि. 26 रोजी संध्याकाळी 6-00 वा. मराठा सांस्कृतिक भवन महात्मा फुले रोड शहापूर येथे कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली आहे. तरी सर्वांनी वेळेवर बैठकीला उपस्थित रहावे.

Read More »

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलमध्ये जवानांचा दीक्षांत समारंभ संपन्न

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४०४ जवानांचा शानदार शपथविधी आणि दीक्षांत समारंभ पार पडला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी सर्वोच्च त्याग करून मातृभूमीचे रक्षण करण्याची शपथ घेतली. ब्रिगेडियर …

Read More »

म. ए. समिती नेत्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित सीमाप्रश्नाच्या खटल्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या खटल्याला गती देता येईल याविषयी महाराष्ट्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. स्वर्गीय एन. डी. पाटील यांच्या पत्नी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती …

Read More »

गियर हेड स्टुडिओचा शुभारंभ; सर्व प्रकारच्या सायकल एकाच छताखाली उपलब्ध

बेळगाव : हनुमान नगर जवळ बॉक्साइट रोडवरील गणश्री स्क्वेअर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या गियर हेड स्टुडिओ या सर्व प्रकारच्या सायकल विक्री शोरूमचे उद्घाटन कारंजी मठ बेळगावचे प. पु. गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या हस्ते फीत कापून नुकतेच करण्यात आले. यावेळी झालेल्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाउंटंट आर. एन. हारगुडे, कॅप्टन …

Read More »

प्रगतिशिल लेखक संघाचे पहिले मराठी साहित्य संमेलन आजपासून

बेळगाव : प्रगतिशिल लेखक संघाचे पहिले मराठी साहित्य संमेलन मराठी विद्यानिकेतनच्या आवारात शनिवारी (ता. २३) व रविवारी (ता.२४) आयोजित करण्यात आले आहे. भाई. एन. डी. पाटील साहित्यनगरीत हे संमेलन होणार आहे. चार सत्रास संमेलन पार पडणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ट साहित्यिक राजा शिरगुप्पे भुषविणार आहेत. शनिवारी २३ रोजी सायंकाळी ५ …

Read More »

डीसीसी बँकेने कृषी पत न देऊ केल्यास उपोषणाचा इशारा

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा डीसीसी बँकेने खानापूर तालुक्यातील कणकुंबी (आमटे), वाटरे, आणि नजिलकोडल आदी कृषीपतीन सोसायटीची कृषी पत अडवून ठेवली आहे, असा आरोप आमटे कृषी पत्तीन सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यानी खानापूर येथील शिवस्मारक सभागृहातील बैठक केला. बेळगांव डीसीसी बँकेने दरवर्षी सरकारच्यावतीने शेतकरी वर्गाला शुन्य टक्ते दराने कृषी कर्ज …

Read More »

गर्लगुंजी माऊली मंदिराच्या रस्त्यासाठी पेव्हर्स कामाचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार फंडामधून गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्री माऊली मंदिर रस्त्यासाठी पेव्हर्स आणि गावातील पांडवनगर सी. सी. रोडसाठी दहा लाख रु. चा निधी मंजूर करून नुकताच कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामाचा शुभारंभ प्रसंगी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, नंदगड मार्केटींग …

Read More »

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठीचे संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी : प्राचार्य पी. बी. पाटील

प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा : सुट्टीच्या काळात वैचारिक मेजवानी : संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार बेळगाव : आज मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी चालत असलेला प्रयत्न तो यशस्वी केला जावा. यासाठी शासनाने विविध प्रकारचे सहकार्य करून मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला …

Read More »

गायकवाड मळा श्री रेणुकादेवी आंबील महाप्रसाद कार्यक्रम

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता गायकवाड मळा येथील श्री रेणुकादेवी मंदिराचा आंबिल महाप्रसाद कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. परंपरागत पध्दतीने सकाळी श्री मातंगी देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आले. यामध्ये महिला भक्तगण सहभागी झाले होते. गायकवाड मळा श्री रेणुकादेवी मंदिरात देवीची विधिवत पूजा करुन आरती सादर करण्यात आली. तदनंतर प्रसादपूजा झालेनंतर …

Read More »

आरपीडी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

बेळगाव : बेळगाव येथील प्रतिष्ठित राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर शनिवारी चर्चासत्र आयोजित केले होते. शहरातील राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालयातील (आरपीडी) केएम गिरी सभागृहात शनिवारी ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2021 : समग्र शिक्षण पद्धतीत बदल’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चन्नम्मा विद्यापीठाचे …

Read More »