Thursday , June 4 2026
Breaking News

प्रगतिशिल लेखक संघाचे पहिले मराठी साहित्य संमेलन आजपासून

Spread the love


बेळगाव : प्रगतिशिल लेखक संघाचे पहिले मराठी साहित्य संमेलन मराठी विद्यानिकेतनच्या आवारात शनिवारी (ता. २३) व रविवारी (ता.२४) आयोजित करण्यात आले आहे. भाई. एन. डी. पाटील साहित्यनगरीत हे संमेलन होणार आहे. चार सत्रास संमेलन पार पडणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ट साहित्यिक राजा शिरगुप्पे भुषविणार आहेत.
शनिवारी २३ रोजी सायंकाळी ५ वाजता काव्यसंमेलन व कवींना मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रा. राजा शिरगुप्पे व संपत देसाई हे मार्गदर्शन करतील. रविवारी सकाळी १० वाजता दमशि मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर अध्यक्षीय भाषणाला सुरुवात होईल. दुसऱ्या सत्रात दुपारी १२.३० वाजता विशेष व्याख्यान होणार आहे. यावेळी विचारवंत भालचंद्र कांगो यांचे भारतातील सध्यस्थिती व लेखकांची जबाबदारी या विषयावर विचार व्याख्यान होईल. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अशोक देशपांडे असतील.
तिसऱ्या सत्रात दुपारी ३ वाजता परिसंवादाचे आयोजन केले आहे. ‘भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लेखकांचे योगदान’ या विषयावर बी. के. कॉलेजचे प्रा.डॉ. द. तु. पाटील हे मार्गदर्शन करतील. यामध्ये आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई, अनिल अजगावकर यांचा सहभाग असेल. या सत्राच्या अध्यक्षस्थानी राणी चन्नमा विद्यापीठ, मराठी विभागाचे प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे असतील. यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. चौथ्या सत्रात सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व डॉ. प्रा. नवनाथ शिंदे, आजरा यांचा संत तुकाराम हा एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांचीही फेस रिडिंगद्वारे हजेरी; शिक्षकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Spread the love  बेळगाव : शिक्षकांची उपस्थिती कर्तव्य ॲपद्वारे फेस रिडिंगच्या माध्यमातून नोंदविली जात असतानाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *