Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर सिव्हील इंजिनियर संघटनेची स्थापना

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सिव्हील इंजिनियर संघटनेची स्थापना गुरूवारी दि. ७ रोजी शिवस्मारक चौकातील सभागृहात उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिव्हील इंजिनियर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुलम होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव सिव्हील इंजिनियर संघटनेचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ, राजेंद्र मुतगेकर, लैला शुर्गसचे एमडी सदानंद पाटील, मांगरिश कंस्ट्रक्शनचे एम. …

Read More »

संकेश्वरात लिंबूच्या दरात वाढ!

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बाजारात कागदी लिंबूला लोकांत मोठी मागणी दिसताहे. उन्हाचा चढता पारा लिंबू दरात वाढ करणारा ठरला आहे. बाजारात लिंबूची आवक घटली असून दरवाढ झालेली दिसत आहे. संकेश्वरात यंदा लिंबू दरांने उच्चांक गाठला असून कागदी लिंबूचा दर शेकडा ५०० ते १२०० रुपये झाला आहे. किरकोळ लिंबू विक्री दहा-बारा …

Read More »

संकेश्वरात श्री कालिकादेवी जात्रामहोत्सव

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री कालिकादेवी देवस्थान जिर्णोध्दार ट्रस्ट कमिटीतर्फे श्री कालिकादेवी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. आज चैत्र पंचमीला सकाळी देवीला महाभिषेक करण्यात आला. महामंगल आरती झाले नंतर गावातील प्रमुख मार्गे श्री कालिकादेवीचा पालखी उत्सव काढण्यात आला. यामध्ये रामबाग, अँथनी येथील मोहनेश आचार्य समुहाने परंपरागत …

Read More »

बेळगावच्या निरंजन श्रीनिवास कारगी याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद!

बेळगाव : बेळगावच्या निरंजन श्रीनिवास कारगी याची पोर्टेबल वॉटर फिल्टर बनविणारा देशातील सर्वात तरुण संशोधक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ‘निरनल’ हे सहज हाताळण्याजोगे जलशुद्धीकरण उपकरण (वॉटर फिल्टर) भारतातील सुरक्षित पिण्याचे पाणी संकल्पनेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची शक्यता आहे. बेस्ट लीडर पुरस्कार मिळवणारा निरंजन आता पुढील वर्षापर्यंत …

Read More »

लाच प्रकरणी एसडीसीवर कारवाई

बेळगाव : दहावीच्या मार्क्स कार्डमध्ये नावात दुरुस्ती करून देतो असे सांगत बाराशे रुपयांची लाच मागणार्‍या सौंदत्ती तालुका गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा क्लार्क वेंकरेड्डी हनुमरेड्डी नगली याला एसीबीने रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे. सौंदत्ती तालुक्यातील हिरेबुधनूर गावच्या मारुती गौडा पाटील आणि त्यांचे मित्र दोघांनी मिळून एसएसएलसीच्या गुणपत्रिकेमध्ये चुकलेले नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्ज …

Read More »

मंदिरांच्या विकासासंदर्भात पर्यटन मंत्र्यांची आम. बेनके यांनी घेतली भेट

बेळगाव : बेळगावचे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांनी आज बुधवारी सकाळी भारत सरकारच्या पर्यटन आणि बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बेळगाव परिसरातील मंदिरांचा विकास आणि जीर्णोद्धारासाठी पर्यटन खात्याकडून 500 लाख (5 कोटी) रुपयांचा निधी मंजूर करण्याची विनंती केली. बेळगाव परिसरातील 4 …

Read More »

अभिषेकच्या खून प्रकरणी पोलिसांचे कानावर हात!

निपाणी (वार्ता) : मूळ राहणार सैनिक टाकळी (ता. हातकणंगले) आणि सध्या राहणार निराळे गल्ली येथील अभिषेक शिवानंद दत्तवाडे या युवकाच्या खून प्रकरणात सहभागी अल्पवयीन संशयित स्वत:हून पोलिसांत हजर झाला होता. दरम्यान मंगळवारी (ता.5) पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी चालविण्याचे वृत्त सूत्रांकडून समजते. तरीही बुधवारी (ता.6) सायंकाळी निपाणीच्या मंडल …

Read More »

बागेवाडी महाविद्यालयास नॅककडून ’ए’ मानांकनाची हॅट्ट्रिक!

अमर बागेवाडी : दोन दिवस घेतला प्रगतीचा आढावा निपाणी (वार्ता): बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाला मंगळवारी (ता. 29) व बुधवारी (ता. 30) या दोन दिवशी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळ (नॅक) कमिटीने भेट दिली. दोन दिवसांत नॅक कमिटीने महाविद्यालयाचा दर्जा, गुणवत्तेसह सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला. त्यानंतर …

Read More »

जीवनात नेहमी धडपड आवश्यक!

परमात्मराज महाराज : ’अंकुरम’च्या शाळा इमारतीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : जीवनात चांगली कामे होण्यासाठी मोठा जनसमुदाय मागे असणे आवश्यक आहे. विश्वासाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. त्यासाठी विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे. शुद्ध संकल्पनेमुळे यश निश्चित मिळते, असे मत आडी येथील दत्त देवस्थान मधील परमाब्धिकार परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केले. येथील …

Read More »

बेळगाव विमानतळावर राज्यातील पहिली ॲम्बुलिफ्ट सुविधा

बेळगाव : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) बेळगाव विमानतळावर पॅसेंजर बोर्डिंग लिफ्ट (पीबीएल) अर्थात ॲम्बुलिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कर्नाटकात अशाप्रकारे पहिल्यांदाच ही सुविधा उपलब्ध झाली आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांसाठी बोर्डिंग वाहन म्हणून ॲम्बुलिफ्टचा वापर केला जातो. कमी गतिशील (पीआरएम) किंवा अपंग विमान प्रवासी, प्रामुख्याने व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तींना …

Read More »