बेळगाव : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) बेळगाव विमानतळावर पॅसेंजर बोर्डिंग लिफ्ट (पीबीएल) अर्थात ॲम्बुलिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कर्नाटकात अशाप्रकारे पहिल्यांदाच ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
विमानाने प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांसाठी बोर्डिंग वाहन म्हणून ॲम्बुलिफ्टचा वापर केला जातो. कमी गतिशील (पीआरएम) किंवा अपंग विमान प्रवासी, प्रामुख्याने व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तींना किंवा वृद्ध व्यक्ती ज्यांना पायर्या चढताना अडचणी येतात अशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ॲम्बुलिफ्ट हे एक वैद्यकीय हायलोडर किंवा हायलिफ्टर आहे. विमानतळावरील कमी गतिशील प्रवासी किंवा अपंग हवाई प्रवाशांसाठी विशेष सहाय्यक किंवा गतिशीलता म्हणून ॲम्बुलिफ्ट वाहन वापरले जाणार आहे.
बेळगाव येथे कर्नाटकात पहिल्यांदा त्याचा वापर केला जाणार आहे हे विशेष होय.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …