Monday , September 7 2026
Breaking News

संकेश्वरात देवरदेवांग दासीमयन्नावर जयंती उत्सव

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) :  संकेश्वर श्री बनशंकरी देवालयात कोष्टी (देवांग) समाजातर्फे देवरदेवांग दासीमयन्नावर यांची 1043 वी जयंती भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. संकेश्वर नेकार हटकर समाजाचे अध्यक्ष दुंडेश शिडल्याळी यांनी देवरदेवांग दासीमयन्नावर प्रतिमेचे पूजन केले. यावेळी बोलताना समाजाचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब हेदुरशेट्टी म्हणाले आद्य वचनकार, नेकार संत देवरदेवांग दासीमयन्नावर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा सरकारचा आदेश असला तरी त्याची अद्याप अंमलबजावणी होईनाशी झाली आहे. देवरदेवांग दासीमयन्नावर यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्याचा आदेश का डावलला जात आहे.तेच समजेनासे झाले आहे. याकरिता समाज बांधवांत नाराजीचा सूर असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी समाजाचे हनुमंत हेदुरशेट्टी, चंदू मिर्जी, बाळकृष्ण कारजीनी, बसवराज बेळकुडी, चंद्रशेखर बेविनकट्टी, अप्पासाहेब हेदुरशेट्टी, राजू मनवाडे, सुनिल सावगांवी,/प्रकाश मिर्जी, समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

दड्डी भागात भात रोपलागणी अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांची पिकांच्या वाढीकडे लागली नजर

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील दड्डी परिसरात यंदाच्या खरीप हंगामातील भात रोपलागणीची कामे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *