Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावसह खानापूर तालुक्यात उद्या वीज पुरवठा खंडित

Spread the love


बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव 110 के.व्ही. मच्छे केंद्राच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा उद्या गुरुवार दि. 7 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खंडित होणार आहे.
बेळगाव व खानापूर तालुक्यातील उद्या वीज पुरवठा खंडित केला जाणारा भाग पुढीलप्रमाणे आहे. बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, तीर्थकुंडये व कवलपूरवाडी तर खानापूर तालुक्यातील उचवडे, कुसमळी, बैलुर, मोरब, जांबोटी, ओलमनी, वडगाव, दारोळी, चापोली, दापोली, मुडवी, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, तोराळी, गोल्याळी, बेटगेरी, तळेवाडी, आमटे, कालमनी, चिखले, कणकुंबी, गवसे, आमगाव, बेटणे, पारगाव, चिगुळे, माण, सडा, चोर्ला, जुने हुळंद आणि नवे हुळंद या सर्व गावांमधील वीज पुरवठा उद्या गुरुवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खंडीत असणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन हेस्काॅमने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *