Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

अनगोळ येथे ३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

  बेळगाव : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढत असताना, बेळगाव शहरात गुरुवारी अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या एका माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना बेळगाव शहरातील अनगोळ परिसरात घडली. इब्राहिम देवलापूर (३७) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. भारतीय सैन्यात सेवा दिल्यानंतर ते …

Read More »

आषाढी एकादशी निमित्त श्रीराम कॉलनी आदर्श नगर रहिवासी संघटनेतर्फे भजनाचा कार्यक्रम…

  बेळगाव : श्रीराम कॉलनी आदर्श नगर रहिवासी संघटनेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भजनाचा कार्यक्रम पार पडला. दि. ०९/०७/२०२५ रोजी गंगा नारायण सभागृहात झालेल्या कार्यक्रमास योगगुरू डॉ. पटृनशेटी व महिला अध्यक्ष सौ. वर्षा घाडी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. हंदीगनूर गावातील भजनी मंडळाच्या पंचवीस भगिनींनी भजनाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या सादर केला. …

Read More »

संतमीरा, शांतिनिकेतन, स्वामी विवेकानंद, देवेंद्र जीनगौडा, हनिवेल शाळा उपांत्य फेरीत

  बेळगाव : गणेशपुर येथील संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक गटात संत मीरा अनगोळ, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद खानापूर आणि हनिवेल खानापूर, देवेंद्र जीनगौडा शिंदोळी या शाळेनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उपांत्यफेरीत प्रवेश केला. सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे …

Read More »

गवाळी गावचे एकत्रितपणे स्थलांतर करा : ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणारे गवाळी हे जेमतेम हजार लोकसंख्या असलेले गाव. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव मूलभूत नागरिक सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित आहे. जवळपास 200 कुटुंब असणारे गवाळी हे गाव सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवून एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी …

Read More »

सरकारने शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यास प्राधान्य द्यावे : रणजीत पाटील

  खानापूर : ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. मात्र शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यास प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खानापूर …

Read More »

गुरुपौर्णिमेनिमित्त संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत गुरुपौर्णिमा निमित्त शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या माधव सभागृहात आयोजित समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास जी आय, जनकल्याण ट्रस्टचे सचिव सुधीर गाडगीळ, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव या मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

सूर्या सॉ मिल मालकाचा मृतदेह मलप्रभा नदीत सापडला!

  खानापूर : खानापूर येथील मारवाडी समाजातील प्रतिष्ठित नागरिक सूर्या सॉ मिलचे दयालाल कर्षन पटेल (वय 65) यांचा मृतदेह कुप्पटगिरी नजीक मलप्रभा नदीपात्रात बांबूच्या झुडूपात अडकलेला आढळला. दयालाल कर्षन पटेल हे मंगळवार दिनांक 8 जुलैपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला होता. मंगळवारी सायंकाळी मलप्रभा नदीच्या घाटावर त्यांचे चप्पल …

Read More »

गोवा येथील अपघातात खानापूरच्या तरुणाचा मृत्यू

  खानापूर : गोव्यातील फोंडा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार झाले तर दोघे जखमी झाले. मृतांपैकी एक खानापूर तालुक्यातील तरुण आहे. गुरुवारी दुपारी फोंडा येथील बेतोडा परिसरात एक भीषण अपघात घडला. या घटनेत खानापूर तालुक्यातील लोंढा पिंपळे येथील आदित्य देसाई (२२) हा तरुण जागीच ठार झाला. …

Read More »

देशपांडे गल्लीतील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी

  बेळगाव : बेळगाव शहरातील देशपांडे गल्ली येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात काल गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. भक्तिमय वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक आरती केली. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून स्वामी समर्थांच्या …

Read More »

सौंदत्ती रेणुका देवी मंदिराच्या दानपेटीत तीन कोटी ८१ लाख जमा

  बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवी मंदिराची दानपेटी उघडण्यात आली असून, एप्रिल ते जून येथील महिन्याच्या कालावधीत देणगी स्वरूपात ३ कोटी ८१ लाख रुपये देणगी जमा झाली आहे. सलग दोन दिवस देणगीची मोजदाद करण्यात आली. मंदिराला देणगीच्या स्वरूपात ३ कोटी ३९ लाख ४० हजार ८३१ रुपये जमा झाले आहेत. यांसह …

Read More »