Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून; धामणे येथील घटना

  बेळगाव : दोन भावांमध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पुनर्वसन हाणामारीत होऊन परिणामी मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी ११ वाजता धामणे गावात घडली. लक्ष्मण भरमा बाळेकुंद्री (वय २८) हे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे, तर मारुती भरमा बाळेकुंद्री (वय ३०) हा आरोपी आहे. …

Read More »

बेळगावात भाजपची जनआक्रोश यात्रा

  बेळगाव : बेळगावात आज भाजपच्या वतीने काँग्रेस सरकारच्या विरोधात ‘जनआक्रोश यात्रा’ काढण्यात आली. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले, देशातील कोणत्याही उद्योजकाला जमणार नाही अशी संपत्ती आणि कर्तबगारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘यंग इंडिया ट्रस्ट’च्या माध्यमातून साध्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शक तपास धोरणामुळे …

Read More »

श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस उत्साहात साजरा; गावात दोन दिवस आनंदोत्सव

  बेळगाव : बिजगर्णी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. देवीसमोर केक कापून भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. गावात दोन दिवस पाळणूक ठेवण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर देवीचा भंडारा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी “ओटी भरण्याचा” सोहळा विशेष आकर्षण ठरला. महिलांनी …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची माहिती घेण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

  शिवाजी विद्यापीठ समितीचा निपाणी, बेळगाव, खानापूर परिसरात दौरा कोल्हापूर : बेळगावसह सीमाभागातील विद्यार्थ्यांना मोफत तसेच सवलतीच्या दरात शिक्षण घेता यावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांत राखीव जागांसह अनेक सवलती देण्यास गेल्या तीन वर्षांपासून सुरवात केली आहे. यंदाही या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक शिष्टमंडळाने सीमाभागातील विविध ठिकाणांना भेटी …

Read More »

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

    बेळगाव : बेळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत पै हॉटेलच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस रोडवर पाईपलाईन घालण्याचे काम सुरू असताना अचानक भूस्खलन होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे. एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसऱ्या कामगाराचा शोध सुरू आहे. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत …

Read More »

देसूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील देसूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने शनिवार दिनांक 12 एप्रिल ते सोमवार दिनांक 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शनिवार दिनांक 12 एप्रील 2025 रोजी सकाळी …

Read More »

पतीने केली 8 महिन्याच्या गर्भवती महिलेची हत्या…

  पालेम : प्रेमविवाह केलेले अनुषा आणि ज्ञानेश्वर हे दाम्पत्य तीन वर्षांपासून कुटुंबापासून दूर होते. अलीकडच्या काळात त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील पालेम येथील उडा कॉलनी येथे वैवाहिक वादातून 8 महिन्याची गर्भवती असलेल्या 27 वर्षीय पत्नीची पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत अनुषा ही 8 …

Read More »

मुडा भूखंड घोटाळा : लोकायुक्तांना चौकशीचे न्यायालयाचे आदेश; सिद्धरामय्यांना धक्का

  ‘बी’ रिपोर्टवर सुनावणी तहकूब केल्याने काहीसा दिलासा बंगळूर : मंगळवारी बंगळुर येथील लोकप्रतिनिधींसाठीच्या विशेष न्यायालयाने लोकायुक्त पोलिसांना म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) प्रकरणात चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी दिली. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का बसला आहे. तथापी, मुडा घोटाळ्याबाबत लोकायुक्तांनी सादर केलेल्या ‘बी’ रिपोर्टवर लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने कोणताही अंतिम …

Read More »

1 मे रोजी ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक….

  बेळगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव शहराची ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक 1 मे रोजी घेण्याचा निर्णय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शिवजयंतीच्या आयोजनासाठी मराठा समाजाचे देवस्थान शहरातील श्री जतीमठ देवस्थान येथे मध्यवर्ती मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 29 एप्रिल रोजी मंगळवारी …

Read More »

संविधान रक्षणासाठी काँग्रेसचा नेहमीच संघर्ष : डॉ. अंजली निंबाळकर

  पणजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोव्यातील पणजी येथे काँग्रेसतर्फे ‘जय बापू जय भीम जय संविधान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण करताना सांगितले की, आज महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी संविधानाच्या रक्षणासाठी, …

Read More »