Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

उर्मिला शहा यांच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध

  शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे ‘माझं घायाळ आभाळ’ कार्यक्रमाचे आयोजन बेळगाव : हरवत चाललेला आपलेपणा, नात्यातली संपत चाललेली ओल वगैरे हक्काच्या आकाशात अन अवकाशात जपता आलं पाहिजे असं सांगणाऱ्या भावगर्भ कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. येथील शब्दगंध कवी मंडळ संघाच्या वतीने सोमवार दि. २४ मार्च रोजी जागतिक कविता दिनानिमित्त कवयित्री उर्मिला …

Read More »

राष्ट्र उभारणीसाठी महिलांचे योगदान महत्वाचे : डॉ. सोनाली सरनोबत

  कुसमळी-खानापूर येथे हळदीकुंकू कार्यक्रम खानापूर : कुसमळी-खानापूर येथील जीर्णोद्धारित महालक्ष्मी मंदिराच्या उद्घाटनाच्या शुभप्रसंगी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बेळगाव दक्षिणचे आमदार श्री. अभय पाटील, भाजप राज्य महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत, पंडित ओगले, ग्रामपंचायत अध्याक्ष सौ. आरोही पाटील, मेघा कदम, अनंत सावंत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. …

Read More »

दुकाने अधिकृत मार्केटमध्ये हलवावीत; स्थानिकांचा आग्रह

  प्रशासन लवकर पावले उचलणार का? – नागरिकांचे लक्ष लातूर (उदगीर) (अविनाश देवकते) : उदगीर शहरातील मध्यवस्तीत कापड मार्केट गल्ली आणि त्यास लागून असलेल्या मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कापड दुकानांविरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे. या संदर्भात स्थानिक पत्रकार रामबिलास आर. नावंदर खेरडेकर यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद उदगीर यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाईची …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतली माजी पंतप्रधान देवेगौडा, केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांची भेट

  बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नवी दिल्ली येथे माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेऊन राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली. राज्याच्या राजकारणात अनेक वाद सुरू असतानाच मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी रात्री जेवणाच्या बहाण्याने नवी दिल्ली येथे …

Read More »

विजयपूरच्या तरुणीची बेळगावात आत्महत्या…

  बेळगाव : एमबीएची पदवी पूर्ण करून कंपनीत प्रशिक्षण घेत असलेल्या तरुणीने बेळगाव येथील पीजीमध्ये ऐश्वर्या नामक तरूणीने आत्महत्या केली आहे. विजयपूर येथील एक युवती एमबीए झाल्यानंतर कामानिमित्त बेळगावात रहायला आली आणि नेहरू नगर येथील पीजीमध्ये राहत होती. गेल्या तीन महिन्यांपासून ती एका कंपनीत प्रशिक्षण घेत होती. मात्र अचानक तिने …

Read More »

शिवमूर्ती विटंबना दंगल प्रकरणी १२ जणांवरील खटला रद्द

  बेळगाव : बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्यानंतर बेळगावमध्ये निषेध करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांनी सरकारी वाहनांवर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली कॅम्प आणि खडेबाजार पोलीस स्थानकात ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी १२ जणांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेली तक्रार खोटी असल्याचे सांगत उच्च …

Read More »

मणतूर्गा गावानजीक चारचाकी वाहनावर अज्ञाताकडून दगडफेक….

  खानापूर : मणतूर्गा गावानजीक सोमवारी मध्यरात्री चारचाकी वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी गाडीवर दगडफेक केल्याने मणतूर्गा भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना कळविताच तात्काळ पोलिसांची 112 क्रमांकाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व घटनेची …

Read More »

जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी : वकिलाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला

  बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील चेन्नापूर डीएलटी तांडा येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या हाणामारीत एका वकिलाच्या कुटुंबातील 9 जणांवर 20 पेक्षा अधिक जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप वकिलाने केला आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांनी कोयता आणि लोखंडी रॉडचा वापर केल्याचे समजते इतकेच नाही …

Read More »

बनावट गुणपत्रिकांचे जाळे : तीन आरोपीना अटक; बेळगावचा आणखी एक आरोपी फरार

  बंगळूर  : कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या नावाने सरकारकडून मान्यता न घेता दहावी आणि बारावीच्या बनावट गुणपत्रिकांचे वितरण करून फसवणुक करणारे जाळे उघड करण्यात सीसीबी पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रशांत गुडुमी उर्फ ​​प्रशांत (वय ४१) रा. चैतन्यनगर, धारवाड, मोनिष (वय ३६) रा. श्रीनिवासनगर, बनशंकरी …

Read More »

हनीट्रॅप प्रकरण : राजण्णा यांनी उच्चस्तरीय चौकशीची केली मागणी

  बंगळूर : सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी मंगळवारी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना भेटून हनीट्रॅप प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती केली, ज्यामुळे केवळ राज्याच्या राजकारणातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही मोठा गोंधळ उडाला आहे. आज संध्याकाळी बंगळुरातील सदाशिवनगर येथील गृहमंत्री परमेश्वर यांच्या निवासस्थानी भेट देऊन राजण्णा यांनी हनी ट्रॅपच्या …

Read More »