Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

महाराष्ट्र गीत लावल्याने पोटशूळ : तिघांवर गुन्हा दाखल

  बेळगाव : रंगपंचमीदिनी डिजेवर महाराष्ट्र गीत लावून नाच केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बेळगाव चव्हाट गल्ली येथे रंगपंचमी दिवशी, महाराष्ट्र गीत लावून तरुणाईने रंगोत्सवाचा आनंद लुटला. मात्र पोटशूळ उठलेल्या काही कन्नडीगांच्या तक्रारीमुळे मार्केट पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. …

Read More »

पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला, बस जळून खाक; पाकचे 90 जवान ठार

  इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये बलूच आर्मी आणि पाकिस्तानी सैन्यात घमासान पाहायला मिळत असून बलूच आर्मीने पाकिस्तानची ट्रेन हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्यानेही ठोक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य दलावर हल्ला करण्यात आला असून बीएलए म्हणजे बलूच आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैन्य जवानांना …

Read More »

सभापती बसवराज होरट्टी यांच्या निवासस्थानाशेजारी दरोडा, दोघांवर झाडल्या गोळ्या

  बेळगाव (प्रतिनिधी) : हुबळी शहरात सभापती बसवराज होरट्टी यांच्या घराशेजारील एका घरावर दरोडा घालणाऱ्या दोघा दरोडेखोरांवर हुबळी पोलिसांनी गोळ्या झाडल्या. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते दोघे दरोडेखोर जखमी झाले असून त्या दरोडेखोरांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या तिघा पोलिसांना उपचारासाठी हुबळीच्या किम्स इस्पितळात दाखल करण्यात …

Read More »

सहाव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार आणि अभ्यासक डॉ. संजय कळमकर यांचे दुसऱ्या सत्रात “साहित्यानंद…!” या विषयावर …

Read More »

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

  कावळेवाडी… दरवर्षी प्रमाणे यंदाही तुकाराम बीजचे औचित्य साधून सलगपणे २६ वर्षे कावळेवाडी गावात उद्या रविवारी पासून पहाटे पासून सुरू होत आहे. अधिष्ठान हभप मारुती म.पाटील, उप अधिष्ठान हभप शिवाजी जाधव. १५ मार्चला गावातून संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दिनांक ९ मार्चला वाचनालयाचे …

Read More »

बिजगर्णीत उद्या म्हैस पळवण्याची जंगी शर्यतीचे आयोजन

  बेळगाव : शेतकऱ्यांच्या जीवनातील एक घटक व जीवापाड प्रेम करतो ती त्यांची जीवनदाहिनी म्हणजे “म्हैस” पळवण्याच्या शर्यतीचे आयोजन करत असतो. यावर्षी देखील श्री शिव शक्ती युवा संघटना यांच्या वतीने होळी निमित्य भव्य म्हैस पळविण्याची स्पर्धा अयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्या रविवारी 16 मार्च रोजी …

Read More »

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची अक्कोळ येथे सदिच्छा भेट

  निपाणी (वार्ता) : सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांचे वंशज व दत्त संस्थान ट्रस्टी अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सदिच्छा भेट देऊन पंतप्रतिमेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.प्रकाश आबिटकर यांची महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. संजय …

Read More »

कंग्राळी खुर्द शाळेत आर्थिक गैरव्यवहार!

  एसडीएमसीची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार; आंदोलनाचा इशारा बेळगाव : कंग्राळी खुर्द प्राथमिक मराठी शाळेतील गत दोन मुख्याध्यापकांनी आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याबाबत त्यांनी कबुली देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच गैरव्यवहार केलेली रक्कमही अद्याप जमा केलेली नाही. आठ दिवसांत रक्कम जमा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा एसडीएमसी, ग्रा. पं. सदस्य …

Read More »

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रंगले बाग साहित्य परिवार समुहाचे वर्धापन दिन व कवी संमेलन

  बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बाग साहित्य परिवाराच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जायंट्स मेन ग्रूप येथे बाग परिवार कवींचे कविसंमेलन नुकतेच पार पडले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांना निमंत्रित करण्यात आले होते. कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी मा.बसवंत शहापूरकर व मार्गदर्शक म्हणून पुढारीचे पत्रकार मा. …

Read More »

स्वामीजींच्या पाया पडणाऱ्या पोलिसांवर गृहविभागाची कारवाई

  बागलकोट : गणवेशात असलेल्या पोलिसांनी स्वामीजींच्या पाया पडल्याने गृहविभागाने पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची अन्य शहरात बदली केल्याची घटना बागलकोट येथे घडली. हुनगुंद तालुक्यातील सिद्दनकोळ येथील शिवकुमार स्वामीजींच्या पाया पडणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. स्वामीजी बदामी येथे आले असता तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वामीजींच्या पाया पडल्या. यावेळी स्वामीजींनी …

Read More »