Sunday , July 26 2026
Breaking News

सहाव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान

Spread the love

 

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार आणि अभ्यासक डॉ. संजय कळमकर यांचे दुसऱ्या सत्रात “साहित्यानंद…!” या विषयावर व्याख्यान होणार आहे. जेष्ठ साहित्यिक ‘पानिपतकार ‘ विश्वास पाटील संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत.

डॉ. संजय कळमकर हे सारांश शून्य, झुंड, चिंब, एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट, दुःखाची स्वगते, बे एक बे, मी मेलो त्याची गोष्ट यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक असून, त्यांच्या साहित्यकृतींना विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार, वि. स. खांडेकर साहित्य पुरस्कार, संतश्रेष्ठ तुकाराम साहित्य पुरस्कार, मृत्युंजय साहित्य पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या काही साहित्यकृतींचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

लेखनाबरोबरच त्यांच्या कथाकथनशैलीला विशेष लोकप्रियता लाभली आहे. कोथरूड साहित्य संमेलनात प्रसिद्ध कथाकार द. मा. मिरासदार यांनी त्यांना “माझा वारसदार” असे गौरवले होते. व्याख्यानात त्यांची तिरकस भाषा, राजकीय कोट्या आणि उपहासात्मक शैली श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी असते.

या संमेलनाच्या आयोजनाबाबत माहिती देताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले की, “साहित्याच्या आनंदाची अनुभूती देणारे हे संमेलन साहित्यरसिकांसाठी पर्वणी ठरेल.” यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील आणि जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे-पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *