Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

बेळगाव महापालिकेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर; प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी १० कोटी रुपयाची तरतूद

  बेळगाव : बेळगाव महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यामध्ये अर्थस्थायी समितीच्या अध्यक्षा नेत्रावती भागवत यांनी १० लाख ३५ हजार रुपये बचतीचे अंदाजपत्रक सादर केले. तसेच महापालिकेकडे थकीत निधी जमा करून प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी १० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. आज बेळगाव महापालिकेत महापौर सविता …

Read More »

सीमाभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वैद्यकीय शिबिराला प्रतिसाद

  बेळगाव : शिवसेना सीमाभागात गेली अनेक वर्षे वैद्यकीय शिबीरांचे आयोजन करते, यावर्षीही दिडशेहुन अधिक शिबीरे सीमाभागात राबविण्यात येत आहेत. बेळगाव, बेळगाव तालुका, खानापूर तालुक्यासह इतर भागात या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबीरामध्ये डोळे तपासणी करून गरज भासल्यास चष्म्यानच वितरण केले जाते. या शिबिराला मन्नूर, बैलूरसह इतर भागात …

Read More »

सीमाप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार जयंत पाटील यांचा पत्रव्यवहार

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जयंत पाटील यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सीमावाद प्रकरणी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद …

Read More »

सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासनाने तज्ञ साक्षीदार बदलला; प्रा. अविनाश कोल्हे यांची नियुक्ती

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “भाषिक राज्यपुनर्रचना” या मुद्यावर तज्ञ साक्षीदार म्हणून प्रा. प्रकाश पवार यांच्याऐवजी प्रा. अविनाश कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र व कर्नाटक शासनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दावा क्र. ४/२००४ अंतर्गत …

Read More »

कडोली साहित्य संघातर्फे रविवारी मराठी भाषा दिन

    कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि मुंबई येथील राज्य मराठी विकास संस्थेतर्फे रविवारी, (ता. 2) सायंकाळी 4-30 वाजता जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. साहित्य संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम होईल. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या भाषण, निबंध आणि …

Read More »

हलगा (ता. खानापूर) ग्राम पंचायत अध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

    खानापूर : हलगा (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायत अध्यक्षाविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अविश्वास ठराव पारित होणार की नाही याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. हलगा ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे तसेच विकास कामे करताना पंचायत सदस्यांना विश्वासात …

Read More »

जायंट्सने वैकुंठभूमीत बसवला अवयवदान आणि देहदान जनजागृती फलक…

  नागरिकांनी अवयवदान देहदानाचे महत्त्व जाणुन गरजूंना मदत करण्यासाठी पुढे यावे : जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील बेळगाव : नागरिकांनी अवयवदान देहदानाचे महत्त्व जाणुन गरजूंना मदत होण्यासाठी पुढे येणे गरजेचे असून जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून खूप मोठ्ठे कार्य बेळगाव परिसरात होत आहे जायंट्स मेन सतत त्यांना सहकार्य करत असते असे विचार …

Read More »

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार

बीड : बीडच्या मस्साजोग गावातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रात खूप गाजले. या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे जोडल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपासून अधिकचा कालावधी झाला तरीही, दोषींवर कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाशी संबंधित खळबळजनक माहिती समोर …

Read More »

डॉक्टर शरद बाविस्कर यांचे शिक्षक व पालकांना मार्गदर्शन…

  मराठी विद्यानिकेतनमध्ये चर्चासत्राचे आयोजन…. बेळगाव : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे तज्ञ प्राध्यापक, फ्रेंच भाषाभ्यासक, तत्त्वज्ञ व साहित्यिक डॉ. शरद बाविस्कर हे मराठी भाषा दिनानिमित्त बेळगावमध्ये आले होते. यावेळी मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षक व पालकांसोबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यांनी शिक्षक व पालकांसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. ‘शिक्षणातील सौंदर्यशास्त्र’ या त्यांच्या …

Read More »

येळ्ळूरच्या आणखी एका खटल्यातील ३९ जणांची निर्दोष मुक्तता

    बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक हटविल्यानंतर पोलिसांनी जनतेलाच अमानुष मारहाण केली होती. तसेच त्यांच्यावर वेगवेगळे सात खटलेही दाखल केले. त्यामधील एका खटल्यातील ३९ कार्यकर्त्यांची द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने शुक्रवारी (दि. २८) निर्दोष मुक्तता केली. येळ्ळूरच्या वेशीत वर्षानुवर्षे उभा असलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हटविण्यासाठी कन्नड दुराभिमान्यांनी उच्च न्यायालयात याचिका …

Read More »