Monday , September 21 2026
Breaking News

कडोली साहित्य संघातर्फे रविवारी मराठी भाषा दिन

Spread the love

 

 

कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि मुंबई येथील राज्य मराठी विकास संस्थेतर्फे रविवारी, (ता. 2) सायंकाळी 4-30 वाजता जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. साहित्य संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम होईल.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या भाषण, निबंध आणि हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी होईल. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राचे पत्रकार सुनील शंकर पाटील आणि कडोलीतील श्रेया ऍग्रो एजन्सीजचे मालक प्रताप पाटील उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे असतील.
या कार्यक्रमाला स्पर्धामधील सर्व विजेते स्पर्धक, संघाचे सर्व कार्यकर्ते, युवक मंडळे, महिला मंडळे तसेच गावातील सर्व मराठी भाषाप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *