Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

महानगरपालिका कर्मचाऱ्याने केली पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे तक्रार

    बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांच्या विरोधात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महानगरपालिका कर्मचारी यल्लेश बच्चलपुरी यांनी सोमवार दिनांक 24 रोजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांकडून आपल्याला त्रास दिला असल्याची लेखी तक्रार त्यांच्याकडे दाखल केली आहे …

Read More »

खानापूरच्या तहसीलदारपदी दुंडाप्पा कुमार यांची नियुक्ती

  खानापूर : खानापूरच्या तहसीलदारपदी दुंडाप्पा कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापदावर असलेले तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर लोकायुक्तांचा छापा पडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, या कारवाईवर त्यांनी न्यायालायात धाव घेऊन स्थगिती आणली होती. मात्र, सोमवारी राज्यातील 19 तहसीलदारांच्या बदली करण्यात आले असल्याचे आदेश महसूल खात्याच्या वतीने काढण्यात …

Read More »

युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार जाहीर; पुरस्कार वितरण समारंभ उद्या

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने प्रति वर्षीप्रमाणे २०२४ -२५ सालचे युवा समिती आदर्श मराठी शाळा पुरस्कार खालील ५ शाळांना जाहीर करीत आहोत. इंग्रजी शिक्षणाकडे सर्वांची ओढ असून देखील पुरस्कार प्राप्त शाळांनी आधुनिक शिक्षण पद्धत अवलंबत मातृभाषेतून शिक्षण देत असतानाच वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रम आपल्या शाळेत राबविले आहेत, …

Read More »

वाटरे – गांधीनगर कृषी पत्तीनच्या कर्ज पुरवठ्याला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

  खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे पालकमंत्री – जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार…. खानापूर : खानापूर तालुक्यातील वाटरे आणि गांधीनगर कृषी पतीन संघासाठी सरकारकडून पत मंजूर झाल्याने शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. याला चार -पाच वर्षे उलटली तरी कर्ज पुरवठा करण्यात आला नाही, यासाठी शेतकऱ्यांनी याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही तालुका आणि जिल्हा डीसीसी बँकेकडून कोणताच …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार सुप्रिया सुळे, ऍड. शिवाजी जाधव यांची भेट

  नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिले आहेत. सीमा प्रश्नाच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्तेही दिल्लीत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन संसदेत …

Read More »

शिवाजी ट्रेलतर्फे राजहंसगड, येळ्ळूर येथे पूजा

    बेळगाव : सालाबादप्रमाणे पुणे स्थित शिवाजी ट्रेल ह्या संघटनेमार्फत जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा सैन्याच्या भारत भर पाऊल खुणा असलेल्या गडांवर, स्वराज्यातील सरदार घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते, एकाच दिवशी, जास्ती जास्त गडांवर पुजा केली जाते. त्याचाचं भाग म्हणून बेळगाव येळ्ळूर जवळील किल्ला, राजहंस गडाची सपत्नीक पूजा शिवाजी …

Read More »

मराठा मंडळ फार्मासी कॉलेजमध्ये विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक दिवसांचे आयोजन

  बेळगाव : बेळगाव येथील ‘मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव या महाविद्यालयात दि. २० ते २२ फेब्रुवारी या तीन दिवसांसाठी इनडोअर गेम्स, विविध स्पर्धा त्याच बरोबर सांस्कृतिक दिवसांचे आयोजन केले होते. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्धिविनायक कॉलेज आँफ फार्मासीचे प्राचार्य, डॉ प्राजक्त केंकरे, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून …

Read More »

कुंभमेळ्याला जाताना वाहनाचा अपघात; गोकाक येथील ६ जणांचा मृत्यू

  बेळगाव : प्रयागराजला जाणाऱ्या 6 प्रवाशांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. सर्व मृत बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील खिटौला पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. वाहन क्रमांक KA-49, M-5054 पहाटे 5 वाजता हा अपघात झाल्याची माहिती आहे. एकूण 8 जणांनी प्रवास केल्याचे सांगण्यात आले, …

Read More »

दुबईत ‘विराट’ वादळ! शतकासह भारताचा शानदार विजय; पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर

  दुबई : भारतने आपल्या पारपंरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसरा विजय साजरा केला. या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचे तिकीट जवळजवळ निश्चित केले आहे. न्यूझीलंडपाठोपाठ भारताकडूनही झालेल्या पराभवाने यजमान पाकिस्तानचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले आहे. यासह टीम इंडियाने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप …

Read More »

मुंबईत धरणे आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही : महाराष्ट्र एकीकरण समितीला उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

  बेळगाव : महायुती सरकार बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी ठाम उभे आहे आपल्या मागण्यांसाठी समितीला मुंबईत धरणे आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. रविवारी दिल्ली मुक्कामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली त्यावेळी …

Read More »