Sunday , July 26 2026
Breaking News

मराठा मंडळ फार्मासी कॉलेजमध्ये विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक दिवसांचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील ‘मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव या महाविद्यालयात दि. २० ते २२ फेब्रुवारी या तीन दिवसांसाठी इनडोअर गेम्स, विविध स्पर्धा त्याच बरोबर सांस्कृतिक दिवसांचे आयोजन केले होते. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्धिविनायक कॉलेज आँफ फार्मासीचे प्राचार्य, डॉ प्राजक्त केंकरे, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. या प्रसंगी मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मासीचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर, स्पोर्ट्स इंचार्ज डॉ महेश भानुशाली तसेच कल्चरल इव्हेंटच्या इंचार्ज डॉ. सुमा हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. इनडोअर गेम्स मधे बुद्धीबळ, कॅरम आदी तर कला प्रकारात रांगोळी, मेहंदी आदी स्पर्धांचा समावेश होता. त्याच बरोबर गायन,नृत्य, रिल मेकींग, वेशभूषा इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. शेवटी पाककला स्पर्धेने या तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमादरम्यान मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *