Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याबाबत समितीच्या शिष्ठमंडळाने घेतली खा. धैर्यशील माने यांची भेट

    बेळगाव : महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात यावे यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली. गेली सहा दशके महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाचा लढा म.ए. समितीच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने सुरू आहे. तसेच सीमाप्रश्नाचा …

Read More »

श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा 13 जानेवारीपासून बेळगावात

    बेळगाव : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सुरू झालेली पालखी परिक्रमा महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून 13 जानेवारी रोजी रात्री बेळगावात येत आहे. पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथे राहणार असून 14 जानेवारीला दत्त मंदिर वडगाव येथील परिक्रमेनंतर …

Read More »

सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याबाबत संजय मंडलिक यांचे महाराष्ट्र शासनाला पत्र

  निपाणी : येथे महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती करणारे पत्र माजी खासदार संजय मंडलिक यांनी नुकतेच उद्योगमंत्री उदय सामंत यांना पाठवले आहे. याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांचे शिष्टमंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडलिक यांना मुरगुड येथे …

Read More »

साठे प्रबोधिनीतर्फे साहित्यिक गप्पाटप्पांचा कार्यक्रम; लेखक डॉ. शरद बाविस्कर यांची भेट

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनयू विद्यापीठाचे प्राध्यापक, भुरा या चरित्रात्मक कादंबरीचे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांच्यासोबत गप्पाटप्पांचा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साठे प्रबोधिनीचे सचिव श्री. सुभाष ओऊळकर उपस्थित होते. त्यांच्या …

Read More »

अर्जुन विष्णू जाधव साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित

  ठाणे : निर्भिड व परखडपणेच लिहिणारे नव्या दमाचे लेखक, कवी आणि पत्रकार अर्जुन विष्णू जाधव यांना मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर जयंती निमित्ताने अर्थात पत्रकार दिनी सा. ठाणे नवादूत याच्या वतीने ‘ साहित्य रत्न ‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अर्जुन विष्णू जाधव मुंबई ठाणे येथील …

Read More »

युवा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहा; चलवेनट्टी भागात जागृती सभा

    बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व तालुका आघाडीतर्फे येत्या 12 जानेवारी रोजी जागतिक युवा दिनानिमित्त युवा मेळावा आयोजित केलेला आहे, महात्मा फुले रोड शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या या मेळाव्याला चलवेनट्टी व इतर भागातील युवकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आज करण्यात आले. चलवेनट्टी …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा

  खानापूर : युवा दिनी आयोजित युवा मेळाव्याला खानापूर तालुका म. ए. समितीने महात्मा फुले रोडवरील मराठा सांस्कृतिक भवन, बेळगांव येथे आयोजित युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा दर्शविला असून तालुक्यातील सर्व युवावर्गाने आणि मराठी भाषिकांनी सदर मेळाव्याला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव …

Read More »

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी ठरला महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी.

    पणजी : समक्य दर्शन राज्यस्तरिय साहित्य समूह सोलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित काव्यलेखन स्पर्धा. महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी/कवयित्री स्पर्धा क्र. १४ चा निकाल घोषितसमूह संस्थापक – देविदास गायकवाड व सुनिता तागवान.प्रशासिका – सुजाता उके. महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी ठरले आहेत मा.नवनाथ रामकृष्ण मुळवी, गोवा तर महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री ठरल्या आहेत मा.वैशाली …

Read More »

संभाजीनगर शाळेतील चित्रकला स्पर्धेत ३७८ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

निपाणी (वार्ता) : येथील संभाजीरातील मराठी मुलांच्या शाळेत सावित्री फुले जयंतीनिमित्त वीरभद्र ऑरगॅनिक अँड सॅंडलवुड अग्रिकल्चर सोसायटी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी. एम. सुगते होते. प्रारंभी एचडीएमसी उपाध्यक्षा वंदना वंजारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर ए. एस. तावदारे, के.डी. खाडे, प्रवीण कोळी, महेश पाटील …

Read More »

अंमलझरी येथील आरोग्य शिबिरात ९७ रुग्णांची मोफत तपासणी

    निपाणी (वार्ता) : येथील मास्क ग्रुप संचलित डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघाचा सेवार्थ दवाखाना आणि प्रेमा शंकर जडी यांचे स्मरणार्थ विश्वस्थ श बसवराज जडी यांच्या नेतृत्त्वाखाली अंमलझरी येथे ‘डॉ. आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार फिरता दवाखाना मोफत रुग्णसेवा शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये …

Read More »