Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

युवा मेळाव्याला उपस्थित राहून सीमालढ्याला बळकटी द्या : शिवाजी हावळणाचे

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण तालुका युवा आघाडी तर्फे आयोजित युवा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवकांनी सीमालढ्याला बळकटी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शिवाजी हावळणाचे यांनी केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२जानेवारी रोजी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा आघाडीतर्फे युवा मेळाव्याचे आयोजन शहापूर महात्मा …

Read More »

कडोली संमेलनाचा मुहूर्तमेढ समारंभ उत्साहात

  कडोली : मराठी साहित्य संघ, कडोली आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे होणाऱ्या 40 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपाचा मुहूर्तमेढ समारंभ शुक्रवारी (ता. 10) सकाळी उत्साहात झाला. कडोलीतील श्री दुरदूंडेश्वर विरक्त मठाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा बँकेचे संचालक विनोद होनगेकर होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून …

Read More »

डॉ. मेधा दुभाषी यांची सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट

    बेळगाव : पुणे येथील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट या संस्थेमधील प्राध्यापिका डॉक्टर मेधा दुभाषी यांनी सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जेष्ठ संचालक श्री. अभय याळगी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड, कार्यवाह सुनीता मोहिते, संचालक प्रसन्न हेरेकर आणि व्यवस्थापक …

Read More »

बेळगावचे डायव्हिंगपटू मयुरेश जाधव, युवराज मोहनगेकर यांना सुवर्ण

  बेळगाव : नुकत्याच चेन्नई येथील वेल्हाचेरी जलतरण तलावात “35 व्या साउथझोन अक्वेटिक डायव्हिंग चॅम्पियनशिप मध्ये कर्नाटक चॅम्पियन” स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत साउथ झोन डायविंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या डायव्हिंगपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना कर्नाटकाला चॅम्पियनशिप मिळवून दिली. कुमार मयुरेश जाधव ग्रुप 1 याने 1 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंगमध्ये सुवर्ण तर 3 …

Read More »

रिअल इस्टेट व्यावसायिकावर अज्ञातांकडून गोळीबार; चालत्या कारवर झाडल्या गोळ्या

  बेळगाव : बेळगावात एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्याची घटना शुक्रवारी सकाळी गणेशपूरच्या हद्दीत घडली. बेळगावच्या शाहुनगर येथील रिअल इस्टेट व्यावसायिक प्रफुल्ल पाटील याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. बेळगुंदी गावातून कारमधून जात असताना गणेशपूर येथील हिंदुनगर रोडवर हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. सुदैवाने या गोळीबारात कारच्या काचा फुटल्या असून, जखमीला …

Read More »

या वर्षीचा रोटरीचा “उत्तम व्यावसायिक अभियंता” पुरस्कार श्री. आर. एम. चौगुले यांना बहाल!

  बेळगाव : कोणताही व्यवसाय करताना प्रामाणिकपणा व पारदर्शकपणा जपला तर तो अधिक वृद्धिंगत होतो हा सर्वसामान्य अनुभव आहे. याच व्यावसायिकतेच्या जोडीला समाज सेवेची किणार लाभली तर तो व्यवसाय समाजाभिमुख होतो आणि ही सामाजिक जाणीव अनेकांच्या आधाराचे केंद्र बनते! श्रीयुत आर. एम. चौगुले यांनी आजवर आपल्या व्यवसायात अनेक मानांकनं प्राप्त …

Read More »

करंबळ परिसरात दहशत माजविणाऱ्या टस्करला वनविभागाकडून जेरबंद

  खानापूर : खानापूर तालुक्यातील करंबळ गावात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या “त्या” टस्कराला अखेर वनविभागाने जेरबंद केले. खानापूर तालुक्याच्या वनपरिक्षेत्रात वाढलेला वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शिमोगा येथील तज्ञ हत्तींचे पथक खानापुरात दाखल झाले असता लागलीच वनविभागाने मोहीम हाती घेतली आणि हत्तीला पकडण्यात यश मिळवले. खानापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून …

Read More »

हुळंद प्रकरणातील तीन अधिकारी निलंबित

  खानापूर : खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील 508 एकर जमिनीच्या प्रकरणात गंभीर भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आल्याने तीन प्रमुख अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. किरणकुमार (एडीएलआर इनचार्ज), पत्थार (सर्वेयर सुपरवायझर इनचार्ज), आणि मुतगी (सर्वेयर) या अधिकाऱ्यांना त्यांनी चुकीचे कागद केल्याच्या आरोपाखाली निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. हुळंद गावातील सर्वेक्षण क्रमांक …

Read More »

पॉवर ट्रेलरमध्ये सापडून शेतकऱ्याचा मृत्यू

  खानापूर : आपल्या शेतात पावर ट्रेलरद्वारे काम करत असताना पॉवर ट्रेलर खाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी, सायंकाळी पाचच्या खानापूर तालुक्यातील चापगाव नजीक घडली. सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव अशोक पुंडलिक पाटील (वय 60 वर्ष) आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती …

Read More »

सदलगा विभाग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मकरंद द्रविड, उपाध्यक्षपदी वैभव खोत यांची निवड

    चिक्कोडी : सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने सोमवार तारीख ६ जानेवारी रोजी शमनेवाडी येथील अमृत गार्डन येथे पत्रकार दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी मावळत्या अध्यक्षा लीना संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक सुभाष बदनीकाई, संतोष कामात, राजू कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत २०२५-२६ या वर्षासाठी अध्यक्ष, …

Read More »