Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावचे डायव्हिंगपटू मयुरेश जाधव, युवराज मोहनगेकर यांना सुवर्ण

Spread the love

 

बेळगाव : नुकत्याच चेन्नई येथील वेल्हाचेरी जलतरण तलावात “35 व्या साउथझोन अक्वेटिक डायव्हिंग चॅम्पियनशिप मध्ये कर्नाटक चॅम्पियन” स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत साउथ झोन डायविंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या डायव्हिंगपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना कर्नाटकाला चॅम्पियनशिप मिळवून दिली.

कुमार मयुरेश जाधव ग्रुप 1 याने 1 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंगमध्ये सुवर्ण तर 3 मीटरमध्ये तृतीय स्थान पटकाविले. कुमार युवराज मोहनगेकर ग्रुप तीन याने 1 मीटर व 3 मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये दोन सुवर्णपदके पटकाविले. कुमार नील मोहिते याने ग्रुप दोन मध्ये 1 मीटर व 3 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये दोन कास्य पदके संपादन केली. कुमारी तन्वी कारेकरने ग्रुप तीनमध्ये एक मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये चौथा क्रमांक पटकाविला.
वरील सर्व जलतरणपटूंना आबा हिंद क्लबचे एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास, पवार शिवराज मोहिते यांचे बहुमोल मार्गदर्शन लागते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *