Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

गडहिंग्लज व नेसरी अंनिसतर्फे सर सेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक परिसराची स्वच्छता!

  गडहिंग्लज (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर हे महापराक्रमी व प्रतापी महापुरुष होते. प्रत्येक रणसंग्रामात शत्रू सैन्याला झोडपून काढणारे प्रतापराव म्हणजे एक झंजावात वादळ होते. स्वराज्याची दीर्घकाळनिष्ठेने सेवा करणाऱ्या प्रतापरावांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ बांधलेल्या नेसरी जवळील स्मारकाची व त्या परिसराची नवीन वर्षाच्या निमित्ताने अनिंसच्या गडहिंग्लज शहर शाखा व नेसरी …

Read More »

छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या वाहनावर नक्षलवाद्यांकडून स्फोटक हल्ला; 9 जवान शहीद

  बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केला असून त्यामध्ये 9 जवान शहीद झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहे. नक्षलवाद्यांनी याठिकाणी अगोदरच भूसुरुंग पेरले होते. या भूसुरुंगाच्या ठिकाणी जवानांचे वाहन येताच नक्षलवाद्यांनी तत्काळ त्याचा स्फोट केल्याची माहिती आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कुत्रु ते बेद्रे मार्गावर करकेलीजवळ नक्षलवाद्यांनी …

Read More »

लक्ष्मीकांत पाटील यांचा मुरगुड येथे सत्कार

  निपाणी : लोकनेते स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल, मुरगुड यांच्यावतीने, मा. खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव, सीमाभाग संघटनेच्या  उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बेळगाव सीमाप्रश्नाच्या दिर्घ अंदोलनाला नव्याने चालना देण्यासाठी आणि …

Read More »

समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची महत्त्वाची भूमिका

  प्रा. डॉ. अच्युत माने; निपाणीत पत्रकार दिन निपाणी (वार्ता) : पत्रकार हा समाजातील आरसा असतो. त्याच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. बातमी मागील बातमी काढण्याची आता गरज निर्माण झाली आहे. देशात वाढलेल्या राजकतेवर अंकुश ठेवण्यासाठी आता लेखणी करावी लागेल. त्यामुळे समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत …

Read More »

अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पुन्हा होणार अनावरण!

  बेळगाव : बेळगावातील अनगोळ येथे काल सायंकाळी भव्य मिरवणूक काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. मात्र, हे अनधिकृत असून शिष्टाचारानुसार छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण आणखी एकदा दणक्यात करण्यात येणार असल्याचे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. बेळगावातील अनगोळ येथे रविवारी सायंकाळी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज …

Read More »

येळ्ळूर संमेलनात विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुरस्काराचे वितरण

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात येळ्ळूर परिसरातील व सीमा भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे नागोजी गावडे, गणपती पाटील होते. …

Read More »

कला दाबून ठेऊ नका, कवितेतून व्यक्त व्हा : महादेव खोत

  कावळेवाडी : प्रत्येकाकडे कोणतीतरी कला अवगत असते वाचन करा, लिहा मनातील भावना व्यक्त करा. कवितेतून मांडायला हवे वास्तव चित्रण समाजात पोहोचले पाहिजे. सुरुवातीला टिका होते.अपयश पचवा, पुन्हा आत्मविश्वासाने पुढे चला. नवोदिताना प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी सामाजिक संस्था कार्यरत आहे हे कौतुकास्पद आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज …

Read More »

धर्मवीर संभाजी चौक अनगोळ येथील संभाजी महाराज पुतळ्याचे थाटात अनावरण

  बेळगाव : येथील धर्मवीर संभाजी चौक अनगोळ येथे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य आणि दिव्य अशा त्याबरोबरच उत्तमरित्या सुशोभित केलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण दिनांक 5 रोजी महाराष्ट्राचे मंत्री  छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज शिवराजेंद्र महाराज भोसले यांच्या उपस्थितीत आमदार अभय पाटील, महापौर सविता कांबळे, माजी महापौर आनंद …

Read More »

श्री मळेकरणी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. जवाहरराव देसाई व व्हा. चेअरमनपदी श्री. अनिल पावशे यांची एकमताने फेरनिवड

  बेळगाव : उचगाव व परिसरातील ग्रामीण भागातील अग्रगण्य तीन दशके पूर्ण करून नावारूपाला आलेली कायम परंपरा अखंडित राखलेली सोसायटी म्हणजेच श्री मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीची बिनविरोध निवडणुक पार पडली. या निवडणुकीत श्री. जवाहरराव शंकरराव देसाई, श्री. अनिल प्रभाकरराव पावशे, श्री. सुरेश खेमान्ना राजुकर, श्री. बाळकृष्ण रामचंद्र देसाई, श्री. मारुती …

Read More »

कंत्राटदार सचिन आणि एसडीए रुद्रण्णा आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी : बेळगावात भाजपची निदर्शने

  बेळगाव : कंत्राटदार सचिन आत्महत्या आणि एस.डी.ए. कर्मचाऱ्याच्या रुद्रेश यडवण्णवर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करत शनिवारी बेळगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कलपासून आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. ठेकेदार सचिन आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात मंत्री प्रियांक खर्गे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली. ठेकेदार सचिन …

Read More »