Monday , May 4 2026
Breaking News

श्री मळेकरणी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. जवाहरराव देसाई व व्हा. चेअरमनपदी श्री. अनिल पावशे यांची एकमताने फेरनिवड

Spread the love

 

बेळगाव : उचगाव व परिसरातील ग्रामीण भागातील अग्रगण्य तीन दशके पूर्ण करून नावारूपाला आलेली कायम परंपरा अखंडित राखलेली सोसायटी म्हणजेच श्री मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीची बिनविरोध निवडणुक पार पडली. या निवडणुकीत श्री. जवाहरराव शंकरराव देसाई, श्री. अनिल प्रभाकरराव पावशे, श्री. सुरेश खेमान्ना राजुकर, श्री. बाळकृष्ण रामचंद्र देसाई, श्री. मारुती भरमा सावंत, श्री. रमेश शंकर घुमटे, श्री. लूमाना लक्ष्मण पावशे, श्री. चंद्रकांत केशव देसाई, श्री. किशोर जयंतराव पावशे, श्री. निळकंठ नगाप्पा कुरबर, श्री. रामा सिडलाप्पा कांबळे, सौ. कविता मनोहर जाधव, सौ. प्रविना पवन देसाई या सदस्यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर चेअरमनपदी संस्थापक श्री. जवाहरराव शंकरराव देसाई व व्हा. चेअरमनपदी अनिल प्रभाकरराव पावशे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी. श्री आर. बी. पाटील सहकार खात्यातील उपनिबंधक कार्यालयातील प्रथम श्रेणीचे अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणुक अधिकाऱ्यानी चेअरमन व व्हा. चेअरमन यांना शुभेछा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व निवडून आलेल्या नव निर्वाचित सदस्याचा सत्कार चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी केला. या निवडीबद्दल संचालक मंडळाचे उचगाव पंचक्रोशित त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जायंट्स मेनतर्फे आदर्शनगरमध्ये सफाई कामगारांचा सन्मान

Spread the love  बेळगाव : “स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता जनतेचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *