Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

बाळंतिणी आणि नवजात शिशूंच्या मृत्यू प्रकरणी कर्नाटक भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

  बेळगाव : बाळंतिणी आणि नवजात शिशूंचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकार काहीही उपाय योजना करत नाही, असा गंभीर आरोप कर्नाटक भाजप महिला मोर्चाने केला आहे. यावेळी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप महिला मोर्चाने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांनी सरकारवर हल्लाबोल करत सांगितले की, बिम्स …

Read More »

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट : 6 जणांचे मृतदेह सापडले

  विरुधुनगर : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला असून या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी आतापर्यंत 6 मृतदेह सापडले असून आणखी लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी बचावकार्य हाती घेतले आहे. स्फोटाचे नेमके कारण कळू शकलेले नाही. परवानाधारक फटाक्यांच्या …

Read More »

बेळगावात भटक्या कुत्र्यांनी घेतला वृद्धाचा बळी

  बेळगाव : बेळगावातील अनगोळ चिदंबरनगरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने एका अज्ञात 60 वर्षीय व्यक्तीचा भीषण मृत्यू झाला. सुमारे 8-10 कुत्र्यांनी वृद्धावर हल्ला केला. कुत्र्यांनी या हल्ल्यात सदर वृद्धाचे कपडे देखील फाडून टाकले आणि त्या वृद्धाच्या शरीराचे लचके तोडले. या भागात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. …

Read More »

पोलिस स्थानकातच महिलेसोबत “रासलीला” करणारा डीवायएसपी निलंबित

  मधुगिरी : जमिनीच्या वादाची तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेसोबत पोलिस स्थानकात “रासलीला” केल्याप्रकरणी तुमकूर जिल्ह्यातील मधुगिरी उपविभागाचे डीवायएसपी रामचंद्रप्पा यांना निलंबित करण्यात आले आहे. जमिनीच्या वादात तक्रार देण्यासाठी आलेल्या पावगड येथील महिलेशी डीवायएसपी रामचंद्रप्पा यांनी बळजबरीने “रासलीला” केली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. डीवायएसपीचा व्हिडिओ व्हायरल होताच डिजी …

Read More »

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथे सौ. सुनिता यल्लाप्पा उडकेकर यांचा सत्कार

  येळ्ळूर : सरकारी मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात येतो. यावर्षीही सामाजिक कार्य करणाऱ्या, नेहमी शैक्षणिक कार्यात सहभागी असणाऱ्या नेताजी गल्ली, येळ्ळूर येथील सौ. सुनीता यल्लाप्पा उडकेकर यांचा शाळेच्या वतीने शाल …

Read More »

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना प्रेस क्लबचा विशेष पुरस्कार

  बेळगाव : महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी आर. हेब्बाळकर यांची बेंगळुरू प्रेस क्लबच्या विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच हमी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांची बंगळुरू प्रेस क्लबच्या विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लक्ष्मी हेब्बाळकर या पाच हमीपैकी सर्वात …

Read More »

म. ए. युवा समिती सीमाभागची विस्तारित कार्यकारिणी जाहीर

  महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी दिनेश कदम यांची निवड बेळगाव : मागील आठवड्यात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग या सीमाभागातील युवकांच्या शिखर समितीची स्थापना हुतात्मा स्मारक परिसरात करण्यात येऊन अध्यक्षपदी शुभम शेळके, कार्याध्यक्षपदी धनंजय पाटील तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील यांची निवड करण्यात आली, आज पुन्हा युवा समिती सीमाभागची बैठक हिंडलगा येथील …

Read More »

सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

    बेळगांव : शहरातील आंबेडकर उद्यान येथे भारत देशातील प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती विविध दलीत संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महात्मा फुले, …

Read More »

आनंदनगर नाल्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळींना निवेदन सादर

  बेळगाव : शहरातील आनंदनगर वडगाव दुसरा क्रॉस येथील नाला बांधकामावर रहिवाशांचा आक्षेप असून, त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर केले. मंत्र्यांनी निवेदन स्वीकारत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सध्या महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आनंदनगर येथे नाल्याचे बांधकाम सुरू आहे. …

Read More »

मराठा मंडळ संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त फार्मासी कॉलेजमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

  बेळगाव : येथील ‘मराठा मंडळ काँलेज आँफ फार्मासी, बेळगाव आणि ‘नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंडळ या संस्थेच्या ९४ व्या वर्धापनदिनानिमित्त काँलेजमधील कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर ३ जानेवारी रोजी आयोजित केले होते. या शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील यांनी नेत्र तपासणी …

Read More »