Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात भटक्या कुत्र्यांनी घेतला वृद्धाचा बळी

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील अनगोळ चिदंबरनगरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने एका अज्ञात 60 वर्षीय व्यक्तीचा भीषण मृत्यू झाला. सुमारे 8-10 कुत्र्यांनी वृद्धावर हल्ला केला. कुत्र्यांनी या हल्ल्यात सदर वृद्धाचे कपडे देखील फाडून टाकले आणि त्या वृद्धाच्या शरीराचे लचके तोडले. या भागात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. गाडीवरून जाणाऱ्यांची पाठलाग करतात. सकाळी पेट्रोल आणण्यासाठी गेलो असता एका वृद्धाचा मृतदेह दिसला. मृतदेहावर कुत्रे चावल्याचे आढळून आले. याबाबत आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांच्या टीमला आणि पोलिसांना कळवले आहे. ते कोण आहेत हे मला माहीत नाही. मला अलीकडेच एका कुत्र्याने चावा घेतला. मनपादेखील कुत्र्यांवर नियंत्रण ठेवत नसल्याचा आरोप परशुराम भीमा मिंजाळकर यांनी केला. उद्यमबाग पोलीस ठाण्याचे सीपीआय धरेगौडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला, गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *