Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

बसचा पत्रा तुटून पडल्याने महिला प्रवासी जखमी

  खानापूर : खानापूर येथे झालेल्या धक्कादायक अपघाताने केएसआरटीसी बस देखभाल आणि व्यवस्थापनातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. बसचा पत्रा तुटून पडल्याने दोन महिला सुदैवाने बचावल्या. निडगल येथील पद्मिनी भुजंग कदम (६५) या गोदगेरीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. रुमेवाडीजवळ गाडीने भरधाव वेग घेतल्याने महिलेच्या पायाखालचे प्लायवूड निखलेले …

Read More »

पायोनियर बँक निवडणूक चौघांची बिनविरोध निवड

  बेळगाव : येथील सर्वात जुन्या असलेल्या दि. पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 15 डिसेंबर रोजी होणार आहे. एकंदर 988 पात्र सभासद मतदान करणार असून 13 जागा पैकी चार राखीव गटातून बिनविरोध उमेदवार निवडून आले असल्याने फक्त सामान्य आणि महिला अशा दोन गटात ही निवडणूक होणार …

Read More »

महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धर्मवीर संभाजी चौकात चोख पोलीस बंदोबस्त!

  बेळगाव : आजपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने धर्मवीर संभाजी चौकात सकाळी अकरा वाजता महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सकाळ पासूनच धर्मवीर संभाजी चौक येथे पोलीस आयुक्त मोठ्या या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने फौज फाट्यासह चोख बंदोबस्त ठेवला असून पोलीस आयुक्त स्वतः उपस्थित आहेत. समितीच्या महामेळाव्याचा धसका …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या वतीने शहरात जनजागृती!

  खानापूर : बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी मराठी भाषिकांच्या वतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही उद्या सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीमाभागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बेळगाव येथील महामेळाव्याला उपस्थित राहावे …

Read More »

माजी आम. डॉ. अंजली निंबाळकर यांची उपस्थितीत हायटेक बस स्थानकातील नूतन “श्री गणेश हॉटेल(कॅन्टीन)चा उद्या शुभारंभ!

  खानापूर : खानापूर शहरातील नूतन हायटेक बस स्थानकातील इमारतीत उभारण्यात आलेल्या श्री गणेश हॉटेल कॅन्टींगचा शुभारंभ उद्या सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सदर कॅन्टींगचे उद्घाटन ऑल इंडिया काँग्रेस पार्टीच्या सचिव तसेच खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. सदर श्री …

Read More »

म. ए. समितीच्या नेत्यांना भेटायला बेळगावला जाणार : शिवसेना नेते उदय सामंत

  मुंबई : बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी दिलेली नाही. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी घातली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत चांगलेच भडकलेत. उदय सामंत यांनी काँग्रेसला हा वाद सोडवायचा नाही, अशी टीका केली. मराठींवर होणाऱ्या अन्यायाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे …

Read More »

कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी

  राष्ट्रीय महामार्गावर बंदोबस्त; अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी कोगनोळी : बेळगाव येथे सोमवार (ता. ९) पासून (ता. १९) पर्यंत राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन चालणार आहे. या पार्श्वभूमीवर निपाणी पोलिसांच्यावतीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कोगनोळी दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे. रविवारपासून सीमेवर जादा पोलिस मागवून नाकाबंदीची कार्यवाही सुरू केली असून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या …

Read More »

युवकांना प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व हरपले; कै. बाबासाहेब भेकणे यांना श्रद्धांजली

  बेळगाव : वेदांत सोसायटी आणि मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच बेळगाव शहर आणि तालुक्यातील विविध संघ संस्थांशी संलग्न राहून कार्यरत असलेले कै. बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त आज भारत नगर येथील वेदांत सोसायटी कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेब भेकणे …

Read More »

अटक होण्याची आम्हाला पर्वा नाही, आम्ही उद्या महामेळावा घेऊच : समिती नेत्यांचा निर्धार

  बेळगाव : कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून बेळगावातील सुवर्ण सौध येथे सुरू होणार आहे. याउलट दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र एकीकरण समितीने परवानगीशिवाय महामेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. टिळकवाडी येथील वॅक्सीन डेपो मैदानावर जाऊन समिती नेत्यांनी मेळाव्याबाबत चर्चा केली. आम्हाला परवानगी मिळो की नाही. महाराष्ट्र सरकारला साथ द्या.पण आम्ही बेळगावचे …

Read More »

विधानसभा सभापतींकडून अधिवेशन तयारीची पाहणी

  बेळगाव : बेळगाव येथे 9 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान विधिमंडळ अधिवेशन पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात आपले विचार मांडले. उद्यापासून कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी दुपारी यु. टी. खादर यांनी सुवर्णसौधला भेट देऊन तेथील अधिवेशन …

Read More »