Monday , September 21 2026
Breaking News

म. ए. समितीच्या नेत्यांना भेटायला बेळगावला जाणार : शिवसेना नेते उदय सामंत

Spread the love

 

मुंबई : बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी दिलेली नाही. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी घातली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत चांगलेच भडकलेत.

उदय सामंत यांनी काँग्रेसला हा वाद सोडवायचा नाही, अशी टीका केली. मराठींवर होणाऱ्या अन्यायाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे आणि मी किंवा आमचे काही सहकारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना भेटायला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी म्हटले की, “बेळगाव प्रकरणामागे कर्नाटकमधील काँग्रेस सरकार आहे. काँग्रेसने हा वाद सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. बेळगाव प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत आम्ही चर्चा करू. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. मी किंवा आमचे काही सहकारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना भेटायला बेळगावला जाणार आहोत”.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *