Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची बैठक संपन्न, लवकरच कार्यकारिणी जाहीर

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित असलेल्या बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची आज गुरुवारी पहिली बैठक बेळगावात पार पडली. या बैठकीला डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या बैठकीत अनिल धुपदाळे यांनी मराठी पत्रकार डिजिटल मीडिया परिषदेच्या ध्येय …

Read More »

“मि. बेळगाव-2024” बॉडी बिल्डिंग स्पर्धा 28 डिसेंबर रोजी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने “मि. बेळगाव-2024” जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शनिवार 28 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजता धर्मवीर छ. श्री संभाजी मैदान, महाद्वार रोड, बेळगाव येथे या स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. “मि. बेळगाव-2024” स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम ते पाचव्या स्थानावर …

Read More »

दडपशाहीला न जुमानता महामेळावा यशस्वी करणार : तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : सीमावासीयांचा बुलंद असा महामेळावा सोमवार दिनांक 9 रोजी बेळगाव येथे घेऊन कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर दिले जाईल. हा महामेळावा कोणत्याही परिस्थितीत होणारच यासाठी सीमावासीयांनी आपापल्या भागात जनजागृती करून हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी तयारीत राहिले पाहिजेत, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व माजी आमदार …

Read More »

अधिवेशनादरम्यान बेळगाव -बंगळुरू विशेष विमानसेवा

  बेळगाव : सुवर्णसौध बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाइन्सतर्फे 9 ते 19 डिसेंबर दरम्यान बेंगळुरू ते बेळगाव दरम्यान विशेष विमानसेवा A320 उड्डाण सुरू करण्यात येणार आहे. सदर विमान बेंगळुरूहून सकाळी 6 वाजता निघेल आणि 7 वाजता बेळगावला पोहोचेल. पुन्हा बेळगावहून सकाळी 7:30 वाजता निघेल आणि सकाळी 8:30 …

Read More »

क्लब रोडला माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद नाव द्या

  बेळगाव महापालिकेच्या बैठकीत मागणी… बेळगाव : बेळगाव महापालिकेत आज बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बेळगाव महापालिकेत आज महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची बैठक बोलावण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीलाच मराठी नगरसेवकांनी सभेच्या नोटिसा, तसेच अधिसूचना व इतर कागदपत्रे कन्नड भाषेत तसेच मराठी भाषेत …

Read More »

प्रलंबित लाभार्थ्यांनाही लवकरच निधीची मंजूरी

  लक्ष्मणराव चिंगळे : मुख्यमंत्री परिहार निधी मंजूरी पत्राचे वाटप निपाणी (वार्ता) : मुख्यमंत्री परिहार निधी योजनेतून आर्थिक सहकार्य मागणीसाठी २० जणांनी आपल्याकडे अर्ज केली होता. त्याप्रमाणे १३ जणांना पहिल्या टप्प्यात निधी मंजूर झाला आहे. हा निधी ३ लाखाहून अधिक आहे. इतर अर्ज प्रलंबित असून तेही लवकरच मंजूर होतील. शस्त्रक्रिया …

Read More »

बोरगाव पट्टण पंचायतीसाठी लवकरच सुसज्ज इमारत

  सहकाररत्न उत्तम पाटील ; विविध विकास कामांचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : पट्टण पंचायत निवडणूक होऊन बराच काळ उलटला. पण अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी रखडल्या होत्या. परिणामी म्हणावी तशी विकास कामे करता आली नाहीत. गतवेळच्या सभागृहावेळी बेळगाव जिल्ह्यात बोरगाव येथे जादा निधी आणून विकास कामे राबवली होती. आता निवडी झाल्या असून …

Read More »

यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन ६ हजार मिळालेच पाहिजेत

  राजू पोवार ; विधानसभेवरील मोर्चाबाबत निपाणीत बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकासह घरांची नुकसान झाले आहे. अजूनही अनेकांना भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांचा उतारा कोरा केला पाहिजे. यंदाच्या हंगामातील ऊसला उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी सरकारने प्रति टन २ हजार रुपये आणि साखर कारखान्यांनी …

Read More »

हिवाळी अधिवेशनात दिलेली कामे सर्व समित्यांनी काळजीपूर्वक पार पाडावीत : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौध येथे होणारे हिवाळी अधिवेशन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. हिवाळी अधिवेशनात सर्व समित्यांनी आपल्यावर नेमुन दिलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. आज गुरुवारी सुवर्णसौध येथे आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. अधिवेशनासाठी येणाऱ्या …

Read More »

जांबोटी, नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात खानापूर समितीच्या वतीने जनजागृती!

  खानापूर : बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी बेळगावात मराठी भाषिकांच्या वतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीमा भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बेळगाव येथील महामेळाव्याला उपस्थित राहावे म्हणून सर्वत्र …

Read More »