Monday , September 21 2026
Breaking News

यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन ६ हजार मिळालेच पाहिजेत

Spread the love

 

राजू पोवार ; विधानसभेवरील मोर्चाबाबत निपाणीत बैठक

निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकासह घरांची नुकसान झाले आहे. अजूनही अनेकांना भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांचा उतारा कोरा केला पाहिजे. यंदाच्या हंगामातील ऊसला उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी सरकारने प्रति टन २ हजार रुपये आणि साखर कारखान्यांनी प्रति टन ४ हजार रुपये असे एकूण ६ हजार रुपये मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी (ता.१६) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सोयाबीन, ऊस भाजीपाला उत्पादकासह इतर शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. मंगळवारी (ता.३) सायंकाळी आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
संघटनेचे राज्य अध्यक्ष चुनाप्पा पुजारी आणि स्वागत केले.
पोवार म्हणाले, ६० वर्षानंतरच्या शेतकऱ्यांना सरकारने दरमहा ५००० रुपये वेतन द्यावे. त्यांना कर्ज देताना सिबिल न पाहता कृषी संघासह इतर बँकांनीही कर्ज उपलब्ध करून द्यावे. तरच पुढील काळात शेतकरी वाचणार आहे. महापुर काळातील नुकसानीचा निपक्षपातीपणे तात्काळ सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी. तरी सोमवारी (ता.१६) सकाळी आठ वाजता अक्कोळ क्रॉस येथे शेतकऱ्यांनी एकत्रित यावे. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन अधिवेशन स्थळाकडे रवाना होणार असल्याचे सांगितले.
बैठकीस प्रकाश नाईक, आशा एम. सिताराम पाटील, एस. के. पाटील, बाबासाहेब कोकाटे, अशोक क्षीरसागर, कल्लाप्पा कोटगे, अनिल संकपाळ, मधुकर पाटील, सुनील तावदारे, प्रताप मेत्राणी, दत्ता लाटकर, सुधाकर माने, बाबासाहेब पाटील, सागर पाटील, बबन जामदार, एकनाथ सादळकर, चिनू कुळवमोडे, कुमार पाटील, नामदेव साळुंखे, शिवगोंडा पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *