Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री

  मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्रचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ …

Read More »

कोणत्याही परिस्थितीत महामेळावा यशस्वी करणार; युवा समितीच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय येथे युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या विरुद्ध महामेळाव्याचे आयोजन सोमवार ९ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. सदर महामेळावा यशस्वी …

Read More »

म. ए. समिती नेत्यांविरोधातील न्यायालयीन सुनावणी आता 16 जानेवारीला

  बेळगाव : 2017 मध्ये व्हॅक्सिन डेपो वर महामेळावा घेण्यात आला होता. 2017 मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यासंदर्भात येथील टिळकवाडी पोलीस स्टेशनने समितीच्या कार्यकर्त्याविरुद्ध दाखल केलेल्या सी्सी424/2020 दाव्यासंदर्भात जे एम एफ सी 4 कोर्ट मध्ये आज पोलिसांच्या वतीने असि स्टंट सब इन्स्पेक्टर एच. एच. पमार यांची साक्ष नोंदविण्यात आली …

Read More »

प्रेम विवाह नाकारल्याच्या रागातून दोघांची हत्या

  निपाणी : प्रेम नाकारल्याचा राग मनात धरून तरुणाने प्रेम करणाऱ्या मुलीच्या आईची व तिच्या भावाची हत्या केल्याची घटना निपाणी तालुक्यातील अकोळ गावात घडली. मंगला नाईक (45) आणि प्रज्वल नाईक (18) अशी हत्या झालेल्याची नावे आहेत. निपाणी तालुक्यातील अकोळ गावातील एका घरात बुधवारी रात्री घडलेल्या घटनेने लोक हादरून गेले. रवीने …

Read More »

बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग समितीचे सदस्यत्व मिळविण्याची सुवर्णसंधी

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या वॉर्ड समिती सदस्य होण्यासाठी महापालिकेकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आपल्या वॉर्डचे सदस्यत्व मिळवून बेळगावच्या विकासात सहभाग घेण्याच्या सुवर्णसंधीचा आजच लाभ घ्या. बेळगाव शहराच्या विकास आणि विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असून वॉर्ड समिती सदस्य बनून शहराच्या समस्यांवर …

Read More »

सोशल मीडियावर मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी करणारा आरोपी अटकेत

  बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर सोशल मीडियावर अवमानजनक भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला तुमकूरमधून अटक करून बेळगाव कोर्टात हजर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात निंदनीय आणि अवमानजनक भाषेत टिप्पणी करणाऱ्या मोहित नरसिंहमुर्ती (38) या व्यक्तीला …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने ४ जानेवारी रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती,बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आयोजित करत आहोत. ही स्पर्धा येत्या ४ जानेवारी २०२५ रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे संपन्न होणार …

Read More »

प्रकाश बेळगोजी, एल. डी. पाटील यांना गुंफण पुरस्कार जाहीर

  चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश सातारा : साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुंफण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये चंद्रशेखर गावस, एल. डी. पाटील, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक आणि प्रकाश बेळगोजी यांचा …

Read More »

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

  अमृतसर : सुवर्ण मंदिराबाहेर झालेल्या गोळीबारातून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. बुधवारी पहाटे सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोराच्या गोळीबारानं सुवर्ण मंदिराबाहेर खळबळ उडाली. मात्र, तिथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडलं. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला तेव्हा झाला, जेव्हा …

Read More »

देवेंद्र फडणवीसच भाजपचे विधिमंडळ पक्षनेते; कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

  मुंबई : मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर …

Read More »