Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजनेमधून येळ्ळूर येथे वात्सल्य घराचे हस्तांतर

  येळ्ळूर : श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजनेच्या ज्ञान विकास कार्यक्रमांतर्गत, महात्मा फुले गल्ली, येळ्ळूर येथील श्रीमती जनाबाई हुवान्नावर यांना वात्सल्य घर बांधण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मंजूर निधीमधून त्यांचे घर पूर्ण झाले असून, त्या वात्सल्य घराचा आज हस्तांतर कार्यक्रम धर्मस्थळ संस्थेचे जिल्हा निर्देशक सतीश नाईक …

Read More »

दुरुस्तीच्या कारणास्तव उद्या बेळगाव शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित

  बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर परिसरात ठिकठिकाणी दिनांक 27 रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील विविध भागात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. राणी चन्नम्मा नगर, बुडा लेआऊट, सुभाषचंद्र नगर, तिसरा रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, …

Read More »

जाएंट्स परिवाराचे माजी अध्यक्ष राजू माळवदे यांचे निधन

  बेळगाव – शहापूर सरस्वती रोड येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि जाएंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारचे माजी अध्यक्ष राजू माळवदे (वय 59) यांचे आज मंगळवार दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने धारवाड येथे निधन झाले. राजू माळवदे हे आज धारवाड उच्च न्यायालय खंडपीठाच्या कामकाजासाठी धारवाडला गेले होते. दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना …

Read More »

संकेश्वर : पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम भूसगोळ विजयी

  संकेश्वर : संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम गणपती भूसगोळ यांनी बाजी मारली असून काँग्रेसच्या उमेदवार भारती मरडी यांना 345 तर अपक्ष उमेदवार गंगाराम भुसगोळ यांना 448 मते पडली. गंगाराम गणपती भूसगोळ यांनी काँग्रेसच्या श्रीमती भारती जितेंद्र मरडी यांचा 130 मतांनी पराभव करून विजयी …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने साक्षरता जनजागृती

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने मराठी प्राथमिक शाळा मन्नूर येथे साक्षरता जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हातात साक्षरतेचे फलक घेऊन जनजागृती रॅलीने सुरुवात केली आणि शिवाजी चौकात रॅलीची सांगता झाली. आरसीबी दर्पणच्या अध्यक्षा Rtn. रुपाली जनाज यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि साक्षरता जागृती मोहिमेचा …

Read More »

राज्यातील ९३ सरकारी शाळात इंग्रजी माध्यम सुरू करण्यास मान्यता

  बंगळूर : पालकांच्या मागणीनंतर, राज्य सरकारने ९३ कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये (केपीएसईएस) इंग्रजी माध्यमाचे विभाग सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. या अतिरिक्त विभागांसाठीचा खर्च २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात या शाळांच्या विकासासाठी राखून ठेवलेल्या अनुदानातून केला जाईल. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग (डीएसईएल) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या शाळांमध्ये २०२५-२६ पासून …

Read More »

भाजपच्या यत्नाळ गटाकडून वक्फविरोधी मोहीमेला चालना

  प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना जोरदार झटका बंगळूर : भाजपचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या नेतृत्वाखालील भाजप गटाने आजपासून सीमावर्ती बिदर जिल्ह्यात पाच जिल्ह्यांमध्ये वक्फविरोधात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. ‘वक्फ हटाओ भारत देश बचाओ’ या घोषणेखाली संघर्ष सुरू झाला. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपचा दारुण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

सरकारी मराठी शाळा शिवाजीनगर खानापूर येथील शिक्षकाची बदली रद्द करण्याबाबत खानापूर समितीच्या वतीने निवेदन

  खानापूर : सरकारी मराठी शाळा शिवाजीनगर खानापूर येथील शिक्षकाची नियोजन पर बदली रद्द करण्याबाबत आज महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सरकारी मराठी प्राथमिक शाळा शिवाजीनगर येथे एकूण 17 मुले शिक्षण घेत आहेत. नियमाप्रमाणे दोन मराठी व एक कन्नड शिक्षक पहिली ते पाचवी वर्गात कार्यरत आहेत असे …

Read More »

निपाणीतील मराठा समाजाचा वधू-वर मेळाव्यात ३०० जणांचा सहभाग

  निपाणी (वार्ता) : येथील शुभकार्य वधू-वर सूचक केंद्रातर्फे येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात राज्यव्यापी सकल मराठा समाज वधू- वर परिचय मेळावा पार पडला. त्यामध्ये कर्नाटक महाराष्ट्रातील ३०० पेक्षा अधिक जणांनी सहभाग घेतला. प्रारंभी दादासाहेब खोत यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात …

Read More »

जीएसएस महाविद्यालयाच्या 50 वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा पुनर्मिलन महामेळावा

  बेळगाव : येथील जीएसएस महाविद्यालयाला नुकताच स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. व्यवस्थापन, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी ही गौरवाची बाब आहे. याबाबतची माहिती माजी विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने 28 डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या मैदानावर “सक्सेरियंस २४ रीकनेक्ट अँड रिजोईस” हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती …

Read More »