Sunday , September 20 2026
Breaking News

जाएंट्स परिवाराचे माजी अध्यक्ष राजू माळवदे यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव – शहापूर सरस्वती रोड येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि जाएंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारचे माजी अध्यक्ष राजू माळवदे (वय 59) यांचे आज मंगळवार दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने धारवाड येथे निधन झाले.

राजू माळवदे हे आज धारवाड उच्च न्यायालय खंडपीठाच्या कामकाजासाठी धारवाडला गेले होते. दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना धारवाड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे. अंत्यसंस्कार रात्री शहापूर स्मशानभूमीत होणार आहेत.राजू माळवदे यांच्या आकस्मिक निधनाने जाएंट्स परिवार सदस्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *