Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

ग्रामीण भागातील रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागाच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून वारंवार मागणी करून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रामुख्याने बेळगाव -बाची, बडस-बाकनूर, मच्छे-वाघावडे, मुतगा-सांबरा या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात माजी महापौर शिवाजी सुंठकर, मार्कंडेय साखर कारखान्याचे चेअरमन आर. आय. पाटील, …

Read More »

संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक २१ पोटनिवडणूकीसाठी आज ४ उमेदवारी अर्ज दाखल

  संकेश्वर : येथील प्रभाग क्रमांक २१ मध्ये पोटनिवडणुक होणार असल्याने तीन इच्छुकांनी एकूण चार उमेदवारी अर्ज शुक्रवारी पालिका कार्यालयात निवडणूक अधिकारी ए. एच. जमखंडी यांच्याकडे दाखल केले. काँग्रेस नगरसेवक जितेंद्र मर्डी यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून आज उमेदवारी अर्ज करण्यात श्रीमती भारती जितेंद्र मर्डी …

Read More »

केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर : मंत्री एच. के. पाटील

  बेळगाव : राज्यात सर्वत्र काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असून पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास विधी व संसदीय कार्यमंत्री एच. के. पाटील यांनी व्यक्त केला. ते आज बेळगावात माध्यमांशी बोलत होते. केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली शिग्गावी पोटनिवडणुकीचा प्रचार करण्यात आला असून, काँग्रेसचा विजय निश्चित आहे. भाजप वक्फसह अनेक …

Read More »

हर्षा शुगर्सचा ऊस गाळप हंगाम सुरू

  बेळगाव : सौंदत्ती येथील हर्षा साखर कारखान्याच्या यंदाच्या ऊस तोडणी हंगामाला श्री उमेश्वर शिवाचार्य स्वामींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सौंदत्ती साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 2023-2024 हंगामात कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या 11 प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. …

Read More »

नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या वडगाव शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वडगाव शाखेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील होते. प्रास्ताविकात संस्थेचे संचालक प्रा. सी. एम. गोरल यांनी संस्थेच्या नऊ वर्षाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यानंतर संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील, व्हा. …

Read More »

मानसिक आरोग्याबाबत सतर्क राहणे आवश्यक

  रुपाली निलाखे; कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : शैक्षणिक प्रवाहात विद्यार्थ्यांकडून असंख्य आव्हानांना सामोरे जाताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होत असून त्याबाबत विद्यार्थी व पालक यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत सुरत येथील प्रसिद्ध मनसोपचार तज्ञ रूपाली निलाखे यांनी व्यक्त केले. रयत …

Read More »

गुंफण मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड

  बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली आहे. रंगनाथ पठारे हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने …

Read More »

अथणी येथील दाम्पत्याची हत्या; पोलिस तपासात निष्पन्न

  अथणी : अथणी शहाराच्या हद्दीतील मदभावी रोडनजीक चौहान मळ्यातील फार्म हाऊसमध्ये एका दाम्पत्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने हत्येचा संशय बळावला आहे. नानासाहेब बाबू चौहान (वय ५८) आणि जयश्री नानासाहेब चौहान (वय ५०) यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचा संशय असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले. …

Read More »

संकेश्वर नगरपालिका प्रभाग क्रमांक 21ची पोटनिवडणूक रंगणार

  संकेश्वर : नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मधील नगरसेवक जितेंद्र मर्डी यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. यामुळे सदर निवडणूक चुरशीची होणार. 23 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या या पोटनिवडणुकीसाठी ॲड. विक्रम करणिग, माजी नगरसेवक गंगाराम भुसगोळ, रवींद्र कांबळे व स्वर्गीय नगरसेवक जितेंद्र मर्डी यांच्या …

Read More »

जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनच्या माध्यमातून शरीरसौष्ठवपटूंना व्यासपीठ मिळणार : आर. एम. चौगुले

  बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशन अँड स्पोर्टस् या संघटनेच्या माध्यमातून दुर्लक्षित शरीरसौष्ठवपटूंना व्यासपीठ मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी शरीरसौष्ठव स्पर्धा गाजवलेले माजी शरीरसौष्ठवपटू याठिकाणी उपस्थित असल्याने विशेष आनंद झाला. संघटनेच्या माध्यमातून स्थानिक शरीरसौष्ठवपटूंना मोठी झेप घेण्यास पोषक वातावरण नक्कीच निर्माण होईल, असे प्रतिपादन उद्योजक आर. एम. चौगुले यांनी केले. …

Read More »