Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

सरकारी कार्यालये, परिसरात धुम्रपान बंदी

  राज्य सरकारचा आदेश जारी बंगळूर : राज्य सरकारने गुरुवारी सरकारी कार्यालये आणि कार्यालय परिसरात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी घालणारा आदेश जारी केला. धूम्रपान आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास हानीकारक असून सार्वजनिक ठिकाणी अशा उत्पादनांच्या सेवनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. कर्नाटक राज्य …

Read More »

वक्फ मिळकत वाद : संयुक्त संसदीय समितीने स्वीकारला अहवाल

  भाजपने सादर केले निवेदन बंगळूर : वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) आज राज्यात आगमन झाले आणि वक्फ वाद उद्भवलेल्या जिल्ह्यांचा दौरा करून अहवाल प्राप्त केला. राज्यात वक्फ वाद चव्हाट्यावर आला असून, विजापूर, बागलकोट, हावेरी, मंड्या, धारवाडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या …

Read More »

रुद्रण्णा यडवनावर आत्महत्या प्रकरण : बेळगावात भाजपाची जोरदार निदर्शने

  बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयाच्या दालनात आत्महत्या केलेल्या एसडीए कर्मचारी रुद्रण्णा यडवनावर यांचा तपास अन्यत्र वळवावा व प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, या मागणीसाठी गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून चन्नम्मा सर्कल येथे रास्ता रोको केला. तहसीलदार कार्यालयातून सौंदत्ती यल्लमा मंदिर देवस्थान प्रशासन कार्यालयात बदली केल्याने तसेच वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून रुद्रण्णाने …

Read More »

रुद्रण्णा आत्महत्या प्रकरण : तिन्ही आरोपी फरारी

  बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एसडीसी रुद्रण्णा यादवण्णावर यांच्या आत्महत्येप्रकरणी बेळगाव येथील खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींनी आपले मोबाईल बंद करून फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. आत्महत्या करणाऱ्या रुद्रण्णाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खडेबाजार पोलिसांनी बेळगावचे तहसीलदार बसवराज नागराळ, अशोक कबलीगार …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायतीत ५४.२९ लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार

चालू वर्षात २९ कामे न करताच ग्रामपंचायत अध्यक्षांनी लाटले पैसे बेळगाव : येळ्ळूर गावात चालू वर्षात २९ कामे न करता ५४ लाख २९ हजार रु. येथील ग्रामपंचायतीच्या महिला अध्यक्षांनी बेकायदेशीरपणे पैसे लाटण्याचा आदेश पारित करून सरकारी पैसा लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वकील सुरेंद्र उगरे यांनी केला. बेळगाव येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

आदेश डावलून कारखाने सुरू करणाऱ्यांवर कारवाई करा

  रयत संघटनेची मागणी ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊस तोडणीसाठी १५ नोव्हेंबरपासून साखर कारखाने चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तरीही कर्नाटक सीमा भागातील काही कारखाने उसाची तोडणी करीत आहेत. त्याची माहिती मिळताच कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते …

Read More »

एसडीए कर्मचारी आत्महत्या प्रकरणी तीन जणांवर एफआयआर : पोलीस आयुक्त

  बेळगाव : बेळगाव येथील एसडीए कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणी खडेबाजार पोलिस ठाण्यात तीन जणांवर एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी तपास अधिक गडद होत असताना, पोलिसांनी तपासासाठी उच्च अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे. याबाबत पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. बेळगावमधील तहशिलदार कार्यालयात झालेल्या एसडीए कर्मचाऱ्याच्या …

Read More »

लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त; एपीएमसी पोलिसांची कारवाई

  बेळगाव : घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला बेळगाव एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. मौल्यवान सोन्याचे दागिने जप्त केल्याची घटना घडली आहे वैभव नगरमध्ये विविध घरफोड्या करून लाखो रुपयांची लूट करणारा आरोपी मस्तान अली शेख याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार करणाऱ्यांना त्यांचे …

Read More »

भाजप आणि जेडीएस विरोधात बेळगावात दलित संघर्ष समितीची निदर्शने

  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात भाजप आणि जेडीएस नेते षडयंत्र रचत आहेत, केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर 10 वर्षात त्यांनी ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जनपर कार्य सहन होत नाही. याचा निषेध व्यक्त …

Read More »

आशादीपतर्फे विद्यार्थिनींना महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदत

  येळ्ळूर : आशादीप सोशियल वेल्फेअर सोसायटीतर्फे येळ्ळूर येथील वडिलांचे छत्र हरवलेल्या दोन विद्यार्थिनींना महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली, यातील एक विद्यार्थिनी बीकॉमचे शिक्षण घेत दुपारी 12 नंतर रोजंदारीसाठी कामावरती जात जात शिक्षण घेत असते. त्याचबरोबर उदरनिर्वाहसाठी त्यांच्या आई सुद्धा रोजंदारीसाठी कामावरती जात असतात, यावेळी आशादीपचे संस्थापक अध्यक्ष अभियंते …

Read More »