Wednesday , April 22 2026
Breaking News

रुद्रण्णा आत्महत्या प्रकरण : तिन्ही आरोपी फरारी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एसडीसी रुद्रण्णा यादवण्णावर यांच्या आत्महत्येप्रकरणी बेळगाव येथील खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींनी आपले मोबाईल बंद करून फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

आत्महत्या करणाऱ्या रुद्रण्णाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खडेबाजार पोलिसांनी बेळगावचे तहसीलदार बसवराज नागराळ, अशोक कबलीगार आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वीय सचिव सोमू या तिघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

रुद्रण्णाने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या मेसेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्येच्या दिवशी कार्यालयात असलेले तहसीलदार बसवराज नगराळ हे पळून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वीय सचिव सोमू आणि अशोक कबलीगार हे आरोपी ए2 आणि ए3 आहेत, तहसीलदार बसवराज नगराल हे ए1 आरोपी आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *