Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

शिंदोळी येथील भारती पुजारी यांच्या कुटुंबीयांची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली भेट

  बेळगाव : शिंदोळी येथील मंदिरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना पाहिल्यामुळे आपले पितळ उघडे पडू नये यासाठी चोरांनी येथील रहिवासी भारती पुजारी यांना विहिरीत ढकलून मारले. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली असून महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज मृत भारती पुजारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी …

Read More »

बेळगाव ते बाची रस्त्याची तात्पुरती डागडुजी

  बेळगाव : पावसामुळे बिकट झालेल्या बेळगाव-बाची रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. गांधी चौक ते कुद्रेमानी या गावापर्यंतच्या रस्त्याची चाळण उडाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामकाजाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी रस्त्याच्या संपूर्ण अवस्थेबाबत अहवाल देण्याच्या सूचना मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना …

Read More »

ईडीने मुडा प्रकरणात सिद्धरामय्यांविरुध्द गुन्हा केला दाखल

  पत्नी पार्वतीसह अन्य तिघांविरुध्दही गुन्हा बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांवर म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाशी (मुडा) संबंधित आणि अलीकडील राज्य लोकायुक्त एफआयआरची दखल घेत, मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. फेडरल एजन्सीने मुख्यमंत्री आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अंमलबजावणी प्रकरण माहिती …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जाहीर आवाहन

  बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत स्वातंत्र्य सेनानी व संयुक्त महाराष्ट्र चळवळतील नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार कोल्हापूरचे माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. महात्मा गांधी विचार मंच गडहिंगलज जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी …

Read More »

खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे म. गांधी जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन

  खानापूर : 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात म. गांधी जयंती साजरी करण्यात येणार आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरातून पदयात्रा काढण्याचे आदेश केपीसीसीने दिले आहेत. खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे 2 ऑक्टोबर म. गांधी जयंती दिवशी खानापूर परिश्वाड क्रॉस येथून सकाळी ठीक 9 वाजता पदयात्रेला सुरवात होणार असून टिपू सुलतान चौक- …

Read More »

महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात नागरिक रस्त्यावर

  बेळगाव : भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या बेळगाव महापालिकेवर बरखास्तीची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बेळगावातील विविध संघटनांनी आज निदर्शने केली. बेळगावात सोमवारी बेळगावातील विविध संघटनांनी मनपातील भ्रष्टाचाराला आळा घालावा, मनपा बरखास्त करण्यात यावी, या मागणीसाठी भव्य निषेध रॅली काढली. यावेळी घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शिवाजीराव पाटील तुतारी हाती घेणार?

  चंदगड : गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी कोल्हापूर भाजपला मोठा धक्का दिला होता. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि चंदगडमधील भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार असल्याचे बोलले …

Read More »

तिरुपती बालाजी लाडू प्रसाद प्रकरण; देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा : सर्वोच्च न्यायालय

  नवी दिल्ली : तिरुपती बालाजी लाडू प्रसाद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहे. लाडू प्रसाद तपासाचा निकाल लागण्याआधीच माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे असं मत न्यायालयाने …

Read More »

2 ऑक्टोबर रोजी साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन

  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे, बेळगुंदी बालवीर विद्यानिकेतनमध्ये दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे, प्रा.सौ. मानसी दिवेकर कोल्हापूर यांचे साहित्य लेखन कसे करावे, या विषयावर मार्गदर्शन केले जाणार …

Read More »

दक्षिण उपनोंदणी कार्यालयाचे जिल्हाधिकारी आवारामध्ये स्थलांतर

बेळगाव : बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालय दक्षिण भागात स्थलांतरित केल्याने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याचा विचार करून सदर कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्थलांतरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे. दक्षिण उपनोंदणी कार्यालय भाडीत्रो इमारतीत असल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच हे कार्यालय शहरापासून सात …

Read More »