बेळगाव : शिंदोळी येथील मंदिरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना पाहिल्यामुळे आपले पितळ उघडे पडू नये यासाठी चोरांनी येथील रहिवासी भारती पुजारी यांना विहिरीत ढकलून मारले.
या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली असून महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज मृत भारती पुजारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी मंत्रिमहोदयांनी सदर घटनेचा तपास लवकरात लवकर करावा व दोषींना शिक्षा द्यावी, अशा सूचना केल्या.