Sunday , June 7 2026
Breaking News

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण निमित्त बीज संकलन उपक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रोडवरील अंकुर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह बीज संकलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची रोपे आज स्कूलच्या आवारात लावली. यामध्ये आंबा, फणस, चिकू याच शिवाय विविध प्रकारच्या औषधी व इतर उपयोगी वनस्पतींचा समावेश करण्यात आला होता.
सध्याच्या ऋतूमध्ये जांभूळ, आंबा, फणस, करवंद अशी विविध फळे उपलब्ध असतात. त्यांचे बीज संवर्धन केले तर ते आपल्याला भविष्यातही आपण झाडे लावण्यासाठी वापरू शकतो. कोणत्याही माळरानावरती आपण या बियांच्या माध्यमातून वृक्षारोपण करू शकतो. याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देतशाळेमध्ये बीज संवर्धनाचा उपक्रमही राबविण्यात आला.
यावेळी शाळेच्या प्राचार्या चेतना चौगुले यांनी विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून देत झाडांचे विविध उपयोग, औषधीय वनस्पतींचे महत्त्व व बीज संवर्धन या विषयांवर सविस्तर माहिती पटवून दिली. सध्या सुरू असलेले निसर्गाचे असंतुलन आपल्याला पुनर्वत करण्यासाठी झाडेच उपयोगी असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने रोप लावणे आवश्यक

Spread the love  नगराध्यक्ष दिगंबर कांबळे; बोरगाव मध्ये पर्यावरण दिन निपाणी (वार्ता) : वाढते प्रदूषण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *